भयानक ताकद समोर आली! निसर्गापुढे कोणाचंच चालत नाही! अजगर शिकार कसा करतो पाहिलंय का? VIDEO पाहिलं तर झोप उडेल! Python Viral Video

Python Viral Video: साप म्हटले की, अनेकांच्या अंगावर अक्षरशः काटा उभा राहतो. जगात सापांच्या अनेक प्रजाती आढळतात. त्यापैकी काहीच प्रजाती विषारी असल्यातरी सापांबद्दलची मनातील भीती सहजपणे निघून जात नाही. त्याच भीतीमुळे बहुतांश लोक सापांच्या आसपास जाणे टाळतात. अजगर हा विषारी नसला तरी तो अत्यंत धोकादायक आणि ताकदवान साप मानला जातो. कारण- तो विषारी सापाप्रमाणे विषाद्वारे संपवत नाही; परंतु तो शिकारीच्या शरीराभोवती घट्ट विळखा घालून, त्याचे श्वास रोखून शिकार संपवतो.

सध्या समाजमाध्यमांवर असाच एक थरकाप उडवणारा व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांचे धाबे दणाणले असून, अजगराची ताकद किती भयानक असते, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे.

गाय म्हैस अर्ज सुरु झाले सोबत मिळणार कडबाकुट्टी यंत्र मुरघास सगळे ५० टक्के अनुदानावर Farmer Subsidy Yojana

या व्हिडीओमध्ये एक भलामोठा अजगर शिकारी म्हणून पकडलेल्या प्राण्याभोवतीचा विळखा घट्ट करीत, त्याला श्वास कोंडून मारत असल्याचे दिसते. विशेष म्हणजे तो प्राणी आधीच मृतावस्थेत होता. मात्र, तरीही अजगराने त्याला इतक्या घट्ट आवळले होते, की तो प्राणी जिवंत असता तरी काही क्षणांत त्याचा जीव गेला असता. हे दृश्य पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते की, एक व्यक्ती मृत ससा अजगरासमोर नेते. शिकार टप्प्यात असल्याचे दिसताच अजगर क्षणाचाही विलंब न करता, त्याच्यावर झडप घालतो. सर्वप्रथम तो सशाचे तोंड आपल्या जबड्यात पकडतो आणि लगेच संपूर्ण शरीराभोवती विळखा घालतो. तो विळखा इतका घट्ट होता की, त्यातील मृत ससा जरी जिवंत असता तरी तो हालचालही करू शकला नसता. हीच अजगराची सर्वांत मोठी ताकद आहे. त्यामुळेच कोणताही माणूस किंवा प्राणी त्याच्या जवळ जाण्याची हिंमत करत नाही.

हा थरारक व्हिडीओ समाजमाध्यमांवरील therealtarzann नावाच्या खात्यावरून प्रसिद्ध करण्यात आला आहे. आतापर्यंत या व्हिडीओला सहा लाखांहून अधिक वेळा पाहिले गेले असून, हजारो लोकांनी त्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी हा व्हिडीओ पाहून “निसर्ग किती निर्दयी असू शकतो,” अशी भावना व्यक्त केली, तर काहींनी “आज अजगराची खरी ताकद पाहायला मिळाली,” असे म्हटले आहे.

काही प्रेक्षकांनी मात्र त्या व्यक्तीला इशारा दिला आहे. अजगरासमोर अशा प्रकारे जाणे धोकादायक ठरू शकते. कारण- अजगर कोणत्या क्षणी आक्रमण करेल, याचा अंदाज बांधणे कठीण असते. क्षणाचाही विलंब न करता, तो आपल्या ताकदीचा वापर करून कोणालाही गाठू शकतो.

हा व्हिडीओ केवळ थरार निर्माण करीत नाही, तर निसर्गातील शिकारीचे भयावह वास्तवदेखील समोर आणतो. अजगर विषारी नसला तरी त्याची ताकद, वेग व पकड इतकी भयानक असते की, त्याच्यापासून सुरक्षित अंतर राखणेच शहाणपणाचे ठरते.

हा व्हिडीओ पुन्हा एकदा सांगून जातो की, निसर्गाशी खेळ करणे किती धोकादायक ठरू शकते आणि अशा प्राण्यांपासून दूर राहणेच आपल्यासाठी सुरक्षित आहे.

मकर संक्रांतीपूर्वी लाडक्या बहिणींना मिळणार ४५०० रुपये: शासनाचे मोठे नियोजन.Ladki Bahin Yojana

येथे पाहा व्हिडीओ

Leave a Comment