19 Minute Viral Video: एका कपल १९ मिनिटांचा खाजगी व्हिडियो सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. सोशल मीडियावरील पोस्टनुसार, हा व्हिडियो त्यांचा प्रायव्हेट असल्याचं सांगितलं जातंय. हा १९ मिनिट ३४ सेकंदांचा असून तो हॉटेल रूममध्ये शूट केल्याचा दावा करण्यात आला आहे.
काहीजण म्हणतात की त्या व्हिडियोमध्ये कपल एकमेकांशी अश्लील चाळे करताना किंवा खाजगी बोलताना दिसतायत. तर काहींचं असं मत आहे की, या कपलने जाणूनबुजून स्वतःचं रेकॉर्डिंग केलं आहे आणि प्रसिद्धी मिळविण्यासाठी व्हिडिओ लीक केला आहे.
काही लोकांनी असा अंदाज व्यक्त केला की हा व्हिडिओ डीपफेक असू शकतो किंवा एआयने बदललेला असू शकतो. पण या पैकी कोणताही दावा तपासून बघितलेला नाही, आणि कोणत्याही वृत्तसंस्थेने हा व्हिडिओ खरा असल्याची पुष्टी केलेली नाही.
१९ मिनिटांचा व्हिडिओ शेअर केल्याने तुम्हाला जेलमध्ये जावे लागेल का?
असा व्हिडिओ शेअर करणे, व्हायरल करणे किंवा पुढे पाठवणे भारतात गुन्हा आहे. IT Act च्या कलम ६७ नुसार, अश्लील सामग्री ऑनलाइन शेअर केल्यास तीन वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ₹५ लाख दंड होऊ शकतो.
जर व्हिडिओमध्ये लैंगिक कृती दाखवलेल्या असतील- जसे या क्लिपमध्ये असल्याचे सांगितले जाते- तर कलम ६७A लागू होते, ज्यात पाच वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि ₹१० लाख दंडाची शिक्षा आहे. याशिवाय IPC कलम २९२, २९३ आणि ३५४C नुसारही अश्लील कॉन्टेन्ट पसरवणे प्रतिबंधित आहे.
मूळ व्हिडिओ शोधण्याचा प्रयत्न सतत वाढत आहे. काही जण म्हणतात की हा जुना अडल्ड व्हिडिओ पुन्हा समोर आला आहे. तर इतरांचे मत आहे की तो एआयने बनवलेला दिसतोय. अधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की असे व्हिडिओ चुकून शेअर केले तरी गुन्हा ठरू शकतो.
जरी, अशा प्रकारचा कॉन्टेन्ट पसरवण्यावर कडक कायदे आहेत तरी, या अफवा असलेल्या क्लिपसाठी काही लोकांनी ₹५०० ते ₹५,००० पर्यंत देऊन तो मिळवण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा सध्या केली जातेय.
१९ मिनिटांचा व्हिडिओ ऑनलाइन कसा व्हायरल झाला?
अद्याप स्पष्ट नाही की व्हिडिओत कोण दिसत आहे किंवा हा व्हिडीओ नेमका कसा समोर आला. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या स्क्रीनशॉट्समधील व्यक्तींची ओळख अजूनही पटली नाही, आणि व्हिडिओ लीक झाला होता, सेट केला होता की डिजिटल बदललेला होता हेही समजलेले नाही.
मात्र, अनेक लोकांनी चुकून असा समज घेतला की व्हिडिओत दिसणारी महिला इन्फ्लुएंसर @sweet_zannat_12374 आहे. मेघालयच्या या इन्फ्लुएंसरनं नंतर स्पष्ट केले की या व्हिडिओत ती नाही, आणि इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करून हे स्पष्ट केले.