अरे जरा तरी लाज वाटू द्या” समोर मृतदेह पडलाय अन् महिला रील करते, VIDEO पाहून सर्वांनाच बसला धक्का. Death Viral video

Death Viral video: आजकाल सोशल मीडियावर रिल्स आणि व्हिडीओचा भडीमार पाहायला मिळतो.आणि त्यात या रिल्ससाठी कोण काय करेल हे सांगता यायचं नाही. रिल्सला व्ह्युज, लाइक्ससाठी कोणत्याही थराला जातील काही सांगता यायच नाही.

सोशल मीडियावर व्हिडीओ आणि रील्स बनवून अनेकांनी आपलं आयुष्य बदललं आहे. आज असे लोक लाखो-कोट्यवधी रुपये कमावत आहेत. पण, व्हिडीओ बनविण्याच्या नादात काहीजण अशा थराला जातात की धक्का बसतो. जगात माणुसकी शिल्लक राहिली नाही असं अनेकदा आपण म्हणत असतो. याचीच प्रचिती देणारा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये दु:खाच्या काळातही महिला व्हिडिओसाठी ड्रामा करताना दिसते. समोर मेलेल्या माणसाचं शव असतानाही महिला रिलसाठी रडण्याचं नाटक करु पाहते. हे सर्वच दृश्य लोकांना धक्का देणारं असतं ज्यामुळे कमी वेळातच हा व्हिडिओ व्हायरल होतो.

व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका वृद्ध माणसाचा मृत्यू झाल्याचे दिसून आले आहे. व्यक्तीचं शव जमिनीवर ठेवलेलं असताना संपूर्ण घरात शोककळा पसरली असते. नातेवाईक आणि शेजारी कुटुंबाला सांत्वन देण्यासाठी एकत्र जमले आहेत. पण या दुःखाच्या क्षणीही, एका महिलेने एक रील बनवण्याचा निर्णय घेतला.

व्हिडिओमध्ये, तुम्हाला ती महिला मृतदेहासमोर बसून रडताना दिसेल, ती रील पूर्णपणे दाखवत आहे. तिने चेहरा रडवेला केला आहे. पण डोळ्यातून अश्रूचा एक थेंब बाहेर पडलेला दिसत नाही. रीलच्या नादात समोर परिस्थिती काय आहे हे सुद्धा या महिला विसरल्या असून यांनी निर्लज्जपणाची सगळी हद्दच पार केली आहे.

२५ लाख ते ६० लाख… गृहकर्जावर महिन्याचा खर्च किती? तुमचा EMI कमी करण्यासाठी ‘हा’ कालावधी निवडा.Home Loan EMI

पाहा व्हिडीओ

सोशल मीडियावर हा व्हिडीओ realistictrolls नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. या महिलांना वृद्धाच्या मृत्यूची रील काढताना पाहून लोकांचा संताप झाला आहे. अनेकांनी या व्हिडीओवर प्रतिक्रिया देत संताप व्यक्त केला आहे.

एकानं म्हंटलंय परिस्थिती काय आहे? “अरे जरा तरी लाज वाटू द्या” रील्स बनवण्याच्या नादात अनेक लोक अशा गोष्टी करतात ज्यामुळे त्यांचा जीवच नाही तर इतरांचाही जीव देखील धोक्यात येतो. आपलं रील सोशल मीडियावर व्हायरल व्हावं हाच त्यांचा उद्देश असतो. पण कधी कधी रील बनवण्याच्या नादात आजूबाजूला काय परिस्थिती आहे हे सुद्धा लोक विसरतात. अशीच एक धक्कादायक घटना सध्या समोर आली आहे.

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक आचारसंहिता बाबत! निवडणूक आयोगाकडून महत्त्वाचे पत्रक जाहीर Panchayat Raj Election Maharashtra

Leave a Comment