महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी 01 नोव्हेंबर 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात. Maharashtra Police Recruitment 2025

Maharashtra Police Recruitment 2025:महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी 01 नोव्हेंबर 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात

पोलीस भरती २०२४–२०२५ साठी उमेदवारांसाठी सूचना सर्वसाधारण सूचना (General Instructions)

3.1) रिक्त पदांची माहिती

पोलीस भरती–२०२५ ही महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील विविध घटकांमधील पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक, बॅण्डस्मन, सशस्त्र पोलीस शिपाई (SRPF), आणि कारागृह शिपाई या संवर्गातील ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत रिक्त झालेल्या पदांवर आधारित आहे.

सदर रिक्त पदे सामाजिक आरक्षणानुसार आणि मागील अनुशेष व बिंदूनामावलीच्या निकषांनुसार निश्चित करण्यात आली आहेत.

महत्वाची संकेतस्थळे

माहितीचा प्रकार संकेतस्थळ

अर्ज भरण्यासाठी आवश्यक माहिती www.policerecruitment2025.mahait.org

महाराष्ट्र पोलीस अधिकृत संकेतस्थळमहाराष्ट्र नोकरी www.mahapolice.gov.in

ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध असलेले संकेतस्थळ a.

🔹 १) ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा कालावधी

क्रमांक तपशील दिनांक व वेळ

1 ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याची सुरूवात दि. ०१ नोव्हेंबर २०२५ रोजी ००:०० वा. पासून

2 ऑनलाईन आवेदन अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत दि. ३० नोव्हेंबर २०२५ रोजी २४:०० वा. पर्यंत

टीप: या कालावधीतच अर्ज सादर करावेत. अंतिम तारखेनंतर कोणताही अर्ज स्वीकारला जाणार नाही.

IMG 20251025 191733

टीप: परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे. एकदा भरलेले शुल्क परत मिळणार नाही.

3.2) निवड प्रक्रियेबाबत सूचना

या भरती प्रक्रियेत तयार करण्यात आलेली निवड यादी (Selection List) ही तात्पुरती (Provisional) असेल.
निवड यादीत नाव आले म्हणजे उमेदवाराला नियुक्तीचा हक्क (Right to Appointment) प्राप्त झाला असे समजले जाणार नाही.
उमेदवारांच्या पात्रता, वैधता, व शारीरिक/शैक्षणिक तपासणीनंतरच अंतिम नियुक्ती केली जाईल.

3.3) नियुक्तीनंतरचे नियम

निवड होऊन नियुक्ती झालेल्या उमेदवारांना महाराष्ट्र पोलीस नियमावली १९९९ तसेच पोलीस महासंचालक कार्यालयाच्या सूचनांनुसार सेवा अटी लागू राहतील.
उमेदवाराने नियुक्ती मिळाल्यानंतर नियमावलीतील सर्व अटींचे पालन करणे बंधनकारक असेल.

 

Leave a Comment