बापरे! एका सीटसाठी सर्व मर्यादा ओलांडली; पुरुषांनी महिलांसोबत भर ट्रेनमध्ये केलं लज्जास्पद कृत्य, VIDEO पाहून बसेल धक्का Train Viral video

Train Viral video: ट्रेनमध्ये भांडण होणं काही नवी गोष्ट नाही. जवळपास प्रत्येक ट्रेनमध्ये दररोज कोणीना कोणी किरकोळ कारणांवरून भांडताना दिसतं. पण हे या भांडणाचं रूपांतर हाणामारीत होऊ नये अन्यथा असं काही तरी घडतं.

आता हा व्हायरल होणारा व्हिडीओ पाहा. बसण्याच्या जागेवरून दोन प्रवाशांमध्ये भांडण झालं. दरम्यान रागाच्या भरात दोन प्रवासी अक्षरश: एकमेकांच्या जीवावर उठले. ही धक्कादायक घटना त्याच डब्यात एका प्रवाशानं आपल्या कॅमेऱ्यात कैद केली. अन् आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

प्रवासादरम्यान अनेक वेळा सीटवरून प्रवाशांमध्ये वाद होत असतात. लांबचा प्रवास करणार्‍या प्रवाशाला पुढच्या प्रवासासाठी बसायला जागा मिळत नाही आणि त्यासाठी मग तो वाटेल ते करू लागतो, तेव्हा भांडण होण्याची शक्यता असते. सीटवरून प्रवाशांमध्ये होत असलेला वाद अनेकदा सोशल मीडियावर पाहायला मिळतो, ज्याचे व्हिडीओ सर्रासपणे व्हायरल होतात, महिलांच्या भांडणाचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील.

लोकलमधली महिलांची भांडण काही नवी नाही, त्यातल्या त्यात पुरुषांच्या भांडणाचे व्हिडीओ क्वचितच पाहायला मिळतात. अशात नुकतीच सोशल मिडियावर एक नवीन घटना शेअर करण्यात आली आहे ज्यात ट्रेनमध्ये प्रवाशांचे महिलेसोबत लज्जास्पद कृत्य दिसून आले. दिल्लीहून बिहारला जाणाऱ्या गर्दीच्या ट्रेनमध्ये प्रवाशांनी सीटसाठी महिलांसोबत चुकीचे वर्तन केले आहे.

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता, दोन महिला ट्रेनमध्ये वरच्या सीटवर बसल्या आहेत यावेळी खालून लोक महिलांचे केस ओढत त्यांना खाली ओढण्याचा प्रयत्न करत आहेत. ट्रेन डब्यातील साधारण सर्वच पुरुष बंडखोरी करत दोन्ही महिलांवर हल्ला करत असतात जे पाहणे खरोखर फार वाईट असते.

संपर्ण डब्यामध्ये गोंधळ माजलेला असतो आणि लोक जास्तीच संतापलेले दिसून येतात. आता परीस्थिती काहीही असो महिलांवर असा अमानुष हल्ला करणं चुकीच आहे आणि यावर अनेक यूजर्सने संताप देखील व्यक्त केला आहे. कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “ट्रेनमध्येच महाभारत सुरू झाले आहे. बिहारच्या लोकांची अवस्था पहा.”

पाहा व्हिडीओ

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment