बापरे पुणेकरांनो सावधान! भर दिवसा रस्त्यावर काय चाललंय पाहा; धक्कादायक VIDEO पाहून तुम्हालाही धडकी भरेल. Viral videos

Viral videos:बापरे पुणेकरांनो सावधान! भर दिवसा रस्त्यावर काय चाललंय पाहा; धक्कादायक VIDEO पाहून तुम्हालाही धडकी भरेल.

लूटमारीच्या, चोरीच्या गुन्ह्यांची संख्या वाढतच चालली आहे. चोर चोरी करण्यासाठी नवनवीन आयडीया घेऊन येत असतात.पुणे शहरातील गुन्हेगारी घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे.

यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. अशातच पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. भरदिवसा रस्त्यात घडलेला प्रकार पाहून तुम्हालाही धक्का बसेल. त्यामुळे पुणेकरांनो रस्त्यावरुन वावरताना जरा सावधान. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

पुण्यातल्या एका रहिवाशानं हा सर्व प्रकार आपल्या कॅमेरात कैद करत सर्वांसमोर आणलाय. झालं असं की, हा व्हिडीओमध्ये दिसणारा व्यक्ती नशेबाज असून तो भर रस्त्यात बस स्टॉपच्या मागे उभा राहून चोरी करण्याचा प्रयत्न करत आहे. यावेळी एक व्यक्ती त्याला ओरडतो. यावेळी तो आक्रमक होत जवळ येतो आणि थेट चाकू काढून स्वत:च्या हातावर वार करतो.

दिनांक 01.07.2025 पासुन कर्मचाऱ्यांच्या डी.ए मध्ये 5% DA फरकासह अदा करणेबाबत नविन आदेश निर्गमित ..DA Allowance 2025

advocate__akshaywagh यांनी व्हिडीओ शेअर करताना घडलेला प्रकार सांगितला आहे, “पुण्यात माझ्या नजरे सामोरं चोरी होत होती, तेव्हा त्याला अडवलं तर त्याने चाकूने वार करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आम्ही तिथे पोलिसांना पाचरण केले पण तो तिथून निघून गेला, मात्र अश्या लोकांना पोलिसांनी पकडून जेल मध्ये डांबल पाहिजे.

अश्या लोकांमुळे वार होऊन कोणाला पण इजा होऊ शकते, आमच्यामुळे त्या मुलाचा मोबाईल आणि पैशे चोरी होण्यापासून वाचले त्याचा आनंद आहे. स्वारगेट पोलीस स्टेशन चे कुडाळकर साहेब यांनी तिथे येऊन आम्हाला मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार. सावधान रहा सतर्क राहा.” हा व्हिडीओ पाहून आपल्या लक्षात येईल की, आपल्या आजूबाजूला काय घडत आहे आणि त्यामुळे आपल्याला सतर्क राहण्याची कशी गरज आहे.

शेतकऱ्यांसाठी दिवाळी भेट! पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता कधी येणार? तुमचे नाव यादीत असे घरबसल्या तपासा. PM Kisan Samman Nidhi

पाहा व्हिडीओ

Leave a Comment