Land Record Online:ई-सर्च, आपले सरकार या प्रणालीद्वारे काढण्यात येणाऱ्या दस्तांवर आता डिजिटल स्वाक्षरी असणार आहे. त्यामुळे असे दस्त नागरिकांना सरकारी कामांसाठी वापरता येणार आहेत. त्यासाठी स्वतंत्रपणे कार्यालयात जाण्याची गरज राहणार नाही.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने ही सुविधा ‘ई-प्रमाण’ या प्रणालीमार्फत हे दस्त उपलब्ध करून दिले आहेत. राज्यात उद्या (ता. १७) पासून राबविण्यात येणाऱ्या सेवा पंधरवड्यात याचा प्रारंभ होणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर याची सुरुवात सातारा जिल्ह्यापासून होणार आहे. या सुविधेत १९८५ पासूनचे दस्त उपलब्ध करून दिले जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा
पूर्वी नागरिकांना नोंदणीकृत दस्ताची प्रत ‘ई-सर्च’, ‘आपले सरकार’ या प्रणालीद्वारे मिळत असे. मात्र, या प्रतीवर संबंधित दुय्यम निबंधकांची स्वाक्षरी नसायची. तसेच स्वाक्षरी
असलेल्या प्रतींसाठी प्रत्यक्ष कार्यालयात जावे लागत असे. नोंदणी व मुद्रांक विभागाने ही प्रक्रिया सोपी करण्यासाठी ‘ई-प्रमाण’ ही नवीन प्रणाली विकसित केली आहे. याद्वारे नोंदणीकृत दस्ताची डिजिटल स्वाक्षरी असलेली प्रत नागरिकांना घरबसल्या एसएमएसद्वारे किंवा त्यांच्या लॉगिनमध्ये मिळणार आहे.
या दस्ताच्या प्रत्येक पानावर संबंधित दुय्यम निबंधकांची डिजिटल स्वाक्षरी असणार आहे. ‘ग्रीन टिक’ किंवा ‘डिजिटल टिक ‘द्वारे दस्ताची सत्यता तपासता येणार आहे. तसेच नागरिकांना एसएमएसद्वारे त्यांची डाउनलोड लिंक मिळेल. ‘डायनॅमिक डिजिटल सिग्नेचर’ ही सुविधा सध्या कार्यरत असलेल्या दुय्यम निबंधकांकडूनच उपलब्ध होईल.
नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या
66 संकेतस्थळावरील ई-सर्व्हिसेसव्या माध्यमातून केलेल्या अर्जावर व आपले सरकार पोर्टलच्या माध्यमातून केलेल्या सर्व अर्जावर दुय्यम निबंधक हे एकत्रितपणे डिजिटल स्वाक्षरी करतील. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या या नोंदणीकृत डिजिटल दस्तांची प्रत मिळणार आहे. राज्य सरकारच्या सेवा पंधरवडा या उपक्रमांतर्गत ही सुविधा सुरू करण्यात येणार आहे.
– अभयसिंह मोहिते, नोंदणी उपमहानिरीक्षक, पुणे
महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा