ट्रॅक्टर व इतर शेती औजारे होणार स्वस्त, केंद्र सरकारचे नवे दरपत्रक जाहीर; कोणत्या औजारात किती सूट?Krushi Yantra New Price 2025

Krushi Yantra New Price 2025:वस्तू आणि सेवा करात GST अलीकडेच करण्यात आलेल्या सुधारणांपैकी कृषी यंत्रसामग्रीसाठी झालेल्या सुधारणांची चर्चा करण्यासाठी दिल्ली येथे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण तसेच ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले.

ट्रॅक्टर आणि यांत्रिकीकरण संघटना (टीएमए), कृषी यंत्रसामग्री उत्पादक संघटना (एएमएमए), अखिल भारतीय एकत्रित उत्पादक संघटना (एआयसीएमए) तसेच भारतीय पॉवर टिलर संघटना (पीटीएआय) यांच्या प्रतिनिधींसह इतर अनेकांनी या बैठकीत प्रत्यक्ष किंवा आभासी पद्धतीने भाग घेतला.

Ladki Bahin Yojana Update : लाडकी बहीण योजने संदर्भात राज्य सरकारचा महत्वाचा निर्णय….

या बैठकीनंतर प्रसार माध्यम प्रतिनिधींशी बोलताना केंद्रीय मंत्री चौहान यांनी जीएसटी दरांमध्ये कपात केल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांचे आभार मानले आणि बैठकीतील चर्चेचे तपशील उपस्थितांना सांगितले.

कृषी यंत्रसामग्रीवर आधी १२% आणि १८% जीएसटी होता तो आता कमी करून ५% करण्यात आला असून येत्या सोमवारपासून म्हणजेच २२ सप्टेंबर पासून नवा दर लागू होणार आहे. शेतकऱ्यांना या कपातीचा थेट लाभ मिळेल असे ते म्हणाले.

केंद्रीय मंत्री म्हणाले की, या बैठकीदरम्यान यंत्रे उत्पादक संघटनांच्या सर्व प्रतिनिधींना असे निर्देश देण्यात आले आहेत की २२ सप्टेंबरपासून लागू होणाऱ्या जीएसटी दरांच्या कपातीचा थेट लाभ संपूर्ण पारदर्शकतेसह शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला पाहिजे.

पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? ‘ही’ चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत! PM Kisan 21st Installment Latest Update

कोणती औजारे किती रुपयांनी स्वस्त होणार?35 अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आता 41,000 रुपयांनी स्वस्त होईल.45 अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आता 45,000 रुपयांनी स्वस्त होईल.50 अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आता 53,000 रुपयांनी स्वस्त होईल.75 अश्वशक्तीचा ट्रॅक्टर आता 63,000 रुपयांनी स्वस्त होईल.

विद्युत तणनाशक यंत्र (7.5 अश्वशक्ती): ₹5,495 ने स्वस्तमालवाहू वाहन ट्रेलर (5-टन क्षमता): ₹10,500 ने स्वस्तबी पेरणी आणि खत यंत्र (11 फाळ): ₹3,220 ने स्वस्तबी पेरणी आणि खत यंत्र (13 फाळ): ₹4,375 ने स्वस्तमळणी कापणी पट्टी यंत्र (14 फूट): ₹1,87,500 ने स्वस्तपेंढा संकलक यंत्र (5 फूट): ₹21,875 ने स्वस्तसुपर सीडर (8 फूट): ₹16,875 ने स्वस्तहॅपी सीडर (10 फाळ): ₹10,625 ने स्वस्तफिरता नांगर (6 फूट): ₹7,812 ने स्वस्तचौकोनी गाठणी यंत्र (6 फूट): ₹93,750 ने स्वस्तमल्चर (8 फूट): ₹11,562 ने स्वस्तहवेच्या दाबा आधारे चालणारे पेरणी यंत्र (4-रांगा): ₹32,812 ने स्वस्तट्रॅक्टरवर बसवलेले फवारणी यंत्र (400-लिटर क्षमता): ₹9,375 ने स्वस्त.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment