8th Pay Commission News:संसदेचा अधिवेशन सुरु असून या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी लोकसभेत मोठी घोषणा केली आहे. देशात १ जानेवारी २०२६ पासून आठवा वेतन आयोग लागू होणार आहे.
आठवा वेतन लागू झाल्यानंतर संपूर्ण देशातील सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन, पेन्शन आणि भत्ते वाढणार आहे.
वेतन आयोगाचे उद्दिष्ट महागाई आणि आर्थिक स्थितीच्या आधारावर कर्मचाऱ्यांचे उत्पन्न संतुलित करुन त्यांचे राहणीमान सुधारणे आहे.
आठव्या वेतन आयोगाच्या शिफारशी १ जानेवारी २०२६ पासून लागू करता येतील, कारण ७ व्या वेतन आयोगाचा कालावधी ३१ डिसेंबर २०२५ रोजी संपणार आहे. पगारातील वाढ फिटमेंट फॅक्टरवर आधारित असेल.
फिटमेंट फॅक्टर म्हणजे काय ?
फिटमेंट फॅक्टर हा एक प्रकारचा गुणक आहे. वेतन आयोगाच्या बाबतीत हा घटक वापरला जातो.
या घटकाचा वापर जुन्या ते नवीन पगारात एकसमान वाढ सुनिश्चित करतो.
सातव्या वेतन आयोगाचा फिटमेंट फॅक्टर २.५७ आहे.
आठव्या वेतन आयोगात फिटमेंट फॅक्टर १.९०, २.०८, २.६८ यापेक्षा कमी किंवा जास्त असू शकतो.
वेतन आयोगाच्या अंमलबजावणीमुळे सुमारे ५० लाख केंद्रीय कर्मचारी आणि ६५ ते ६८ लाख पेन्शनधारकांना फायदा होणार आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा