ZP Election update 2025 : नगरपरिषद, नगरपंचायत समितीची आचारसंहिता लागून निवडणुक कार्यक्रम सुरू झाला आहे. आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची आचारसंहिता १५ किंवा १६ नोव्हेंबरला लागेल, अशी चर्चा आहे. त्यामुळे विभागांनी कामे आटोपते घेण्यासाठी धावपळ चालविली आहे. फायलींच्या मंजुरीचा वेग वाढल्याचे चित्र प्रशासनात आहे.
राज्यात नगरपरिषद व नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी आचारसंहिता लागल्यानंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती
निवडणुकीची जोरदार तयारी सुरू झाली आहे. प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला आहे. या निवडणुकांसाठीची आचारसंहिता १५ किंवा १६ नोव्हेंबर लागेल, अशी चर्चा प्रशासकीय व राजकीय वर्तुळात
आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या विविध विभागांमध्ये कामे आटोपती घेण्यासाठी मोठी धावपळ सुरू झाली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर विकासकामे, निधीवाटप आणि मंजुरीवरील प्रक्रिया स्थगित होते.
त्यामुळे विविध विभागांनी प्रलंबित प्रस्तावांना अंतिम मंजुरी देण्याचे काम वेगाने सुरू केले आहे. शिक्षण विभाग, बांधकाम विभाग, पाणीपुरवठा विभाग व लघुसिंचन विभागात फायलींची हालचाल वाढली आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून अधिनस्थ कर्मचाऱ्यांना कामे वेळेत पूर्ण करण्याच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक विभागाने प्रलंबित कामांचा अहवाल वरिष्ठांना सादर करावातसेच प्रलंबित मंजुरी तातडीने घ्याव्यात, अशा सूचना आहेत.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा