Zilaparishad Employee GR:जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांकरीता ग्राम विकास विभाग मार्फत दिनांक 18 जुलै 2025 रोजी अत्यंत महत्वपुर्ण शासन राजपत्र निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदर शासन परिपत्रकानुसार , नमुद करण्यात आलेले आहेत कि , महाराष्ट्र जिल्हा परिषद सेवा नियम 1967 मध्ये जोडण्यात आलेल्या परिशिष्ट – 4 मधील अनुक्रमांक 08 नंतर सदर राजपत्रांमधील नोंद समाविष्ट करण्यात येत आहे .
जिल्हा सेवा ( वर्ग – 03 ) प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक : जिल्हा सेवा ( वर्ग – 03 ) प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक यांची पदोन्नती ही केंद्रप्रमुख या पदावर करण्यात येणार असून , केंद्र प्रमुख या पदावरील नियुक्ती एकतर पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शाळेतील मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असणाऱ्या व प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( प्राथमिक ) या पदावर 06 वर्षांपक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा ..
असणाऱ्या व्यक्तींमधून ज्येष्ठतेच्या आधारे , योग्य व्यक्तींच्या पदोन्नतीने करण्यात येईल , व पदोन्नतीसाठी पात्र असणाऱ्या व त्या पदावर 06 वर्षांपेक्षा कमी नसेल इतकी अखंड नियमित सेवा असणाऱ्या जिल्हा परिषदेमधील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पद धारण करणाऱ्या व्यक्तींमधून पात्रतेच्या अधिन राहून ज्येष्ठतेच्या आधारे योग्य व्यक्तींच्या पदोन्नतीने करण्यात येईल असे नमुद करण्यात आलेले आहेत .
परंतु पदोन्नतीने नियुक्तीसाठी जिल्हा परिषदेतील प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( प्राथमिक ) संवर्गाची ज्येष्ठता विचारात घेण्यात येईल , असे नमुद करण्यात आले आहेत . तसेच शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने वेळोवेळी विहीत करण्यात आलेले धोरण व कार्यपद्धतीनुसार त्यासाठी घेण्यात आलेल्या मर्यादेत विभागीय स्पर्धा परीक्षेच्या निकालातुन गुणवत्तेच्या आधारावर योग्य उमेदवारांची निवड करुन ..
ज्याने जिल्हा परिषदेच्या जाहीरात वर्षाच्या 01 जानेवारी या दिनांकास प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( प्राथमिक ) म्हणून किमान 06 वर्षे इतकी अखंड नियमित सेवा केली आहे . तसेच जो जिल्हा परिषदेमध्ये प्रशिक्षित शिक्षक हे पद धारण करीत आहे , व ज्याने शालेय शिक्षण विभागाने वेळोवेळी विहीत करण्यात आलेली प्रशिक्षित पदवीधर शिक्षक या पदासाठीची शैक्षणिक अर्हता धारण केली आहे .
व जाहीरात वर्षांच्या 01 जानेवारी या दिनांकास किमान 06 वर्षे इतकी अखंड नियमित सेवा केली आहे . अशा केंद्र प्रमुख पदावरील नियुक्ती ही पदोन्नतीने व निवडीद्वारे अनुक्रमे 50:50 या प्रमाणात करण्यात येणार असल्याची बाब नमुद करण्यात आलेली आहे .
शासन राजपत्र डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा