Women Child Development Selection List 2025: महिला व बालविकास निवड यादी जाहीर
महिला व बालविकास आयुक्तालय पत्ता: २८, राणीचा बाग, जुन्या सर्किट हाऊस शेजारी, पुणे – ०१
प्रसिध्दीपत्रक
महिला व बालविकास आयुक्त, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या अधिनस्त आस्थापनेवरील गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड या संवर्गांतील रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यासाठी पात्र उमेदवारांची संगणक आधारीत वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरूपातील ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली होती. ही परीक्षा दिनांक १० फेब्रुवारी २०२५ ते १३ फेब्रुवारी २०२५ तसेच १७ फेब्रुवारी २०२५ या कालावधीत विविध सत्रांमध्ये पार पडली.भरती परीक्षा पुस्तके
निवड यादी जाहीर येथे पहा
निकाल जाहीर
वरील ऑनलाईन परीक्षेचा पदनिहाय आणि संवर्गनिहाय निकाल दिनांक २ जून २०२५ रोजी महिला व बालविकास आयुक्तालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर (www.wcdcommpune.com) प्रकाशित करण्यात आला आहे. उमेदवारांनी आपल्या निकालाची माहिती संकेतस्थळावरून तपासावी.
तात्पुरती प्रतिक्षा यादी
या भरती प्रक्रियेसंदर्भात खालील संवर्गांसाठी तात्पुरती प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आलेली आहे –
येथे पहा निकाल PDF
परिविक्षा अधिकारी
वरिष्ठ लिपीक / सांख्यिकी सहायक
संरक्षण अधिकारी (कनिष्ठ)
कनिष्ठ काळजीवाहक
ही तात्पुरती प्रतिक्षा यादी या प्रसिध्दीपत्रकासोबत प्रसिद्ध करण्यात आली आहे.
आक्षेप नोंदविण्याची सूचना
ज्या उमेदवारांना वरील तात्पुरत्या प्रतिक्षा यादीबाबत काही आक्षेप किंवा हरकती असतील, त्यांनी त्या या प्रसिध्दीपत्रकाच्या दिनांकापासून ७ दिवसांच्या आत लेखी स्वरूपात नोंदवाव्यात.
आक्षेप सादर करताना आवश्यक त्या संबंधित कागदपत्रांची जोड देणे बंधनकारक आहे. हे आक्षेप पुढील पत्त्यावर सादर करावेत
आयुक्त, महिला व बालविकास आयुक्तालय,
राणीचा बाग, व्ही.आय.पी. सर्किट हाऊस शेजारी,
(बार्टी कार्यालय परिसर), पुणे – ४११००१.
विहीत मुदतीनंतर प्राप्त झालेल्या आक्षेपांवर कोणतीही दखल घेतली जाणार नाही, याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.