अरे बापरे’ सिंहाने केला जंगली कुत्र्यावर जीवघेणा हल्ला; घटनेचा थरारक VIDEO पाहून उडेल थरकाप.Wild Animals Viral Video

Wild Animals Viral Video: माणसांच्या आयुष्यात जसा जगण्यासाठी संघर्ष सुरू असतो, तसाच संघर्ष प्राण्यांच्या आयुष्यातही पाहायला मिळतो. जंगलातील वाघ, सिंह, बिबट्या यांसारखे प्राणीदेखील भूक मिटविण्यासाठी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात. यासाठी ते वापरत असलेले डावपेच आपल्या काळजाचा ठोका चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होतोय, ज्यात एक सिंह जंगली कुत्र्यावर हल्ला करताना दिसत आहे.

समाजमाध्यमांमुळे नेहमीच विविध गोष्टी आपल्या नजरेस पडतात, ज्यात अनेकदा जंगलातील प्राण्यांचे व्हिडीओदेखील व्हायरल होतात. त्यामध्ये कधी वाघ, बिबट्या यांसारखे हिंस्र प्राणी एखाद्या प्राण्याची शिकार करताना दिसतात, तर काही प्राणी एकमेकांशी भांडताना दिसतात किंवा एकमेकांसोबत खेळताना दिसतात. प्राण्यांचे असे व्हिडीओ नेहमीच युजर्सचे लक्ष वेधून घेतात. आतादेखील असाच एक व्हिडीओ खूप व्हायरल होतोय, जो पाहून तुम्हीदेखील काही क्षण चकित व्हाल.

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एका घनदाट जंगलामध्ये शिकारीच्या शोधात असलेल्या सिंहाला जंगली कुत्रा दिसतो. यावेळी सिंह जंगली कुत्र्याच्या दिशेने वेगाने धावतो आणि त्याच्यावर झडप घालतो. जंगली कुत्र्याला जबड्यात पकडताच दुसरा जंगली कुत्रा जबड्यात पकडलेल्या जंगली कुत्र्याला सोडवण्यासाठी प्रयत्न करताना दिसतोय. सध्या जंगलातील हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Leave a Comment