VIDEO VIRAL : सोशल मीडियावर सध्या एक धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एका तरुणाने सापाशी खेळ करण्याचा प्रयत्न केला, पण त्याची ही धाडसाची नशा त्यालाच महागात पडताना दिसते.
नेमकं काय घडलं?
व्हिडिओमध्ये दिसतं की, एक तरुण पळणाऱ्या सापामागे धावत जातो. काही क्षणांतच तो सापाची शेपटी पकडतो आणि त्याला उचलण्याचा प्रयत्न करतो. मात्र, साप लगेचच आक्रमक होतो आणि फणा काढत तरुणावर पलटवार करतो.
साप थेट त्याच्या छातीवर झेप घेतो, ज्यामुळे तरुण घाबरून जातो. इतक्यावरच न थांबता, तो पुन्हा सापाच्या मागे धाव घेतो. यावेळी साप अधिक आक्रमक होऊन त्याच्या चेहऱ्याकडे झेपावतो. स्वतःचा बचाव करताना तरुण जमिनीवर कोसळतो.
धक्कादायक बाब म्हणजे, एवढं सगळं घडूनही तो पुन्हा सापाला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतो.
धोकादायक स्टंटचा वाढता ट्रेंड
अलीकडच्या काळात सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक जीव धोक्यात घालणारे स्टंट करताना दिसत आहेत. कधी बाईक स्टंट, कधी धावत्या ट्रेनमध्ये चढणे, तर कधी अशा वन्यप्राण्यांशी खेळ — हे प्रकार वाढत चालले आहेत.
लाईक्स, व्ह्यूज आणि फॉलोअर्सच्या नादात अनेकजण स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात टाकतात.
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरील @nituchowdhury222 या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून त्याला मोठ्या प्रमाणात व्ह्यूज आणि लाईक्स मिळत आहेत. मात्र, अनेक नेटकऱ्यांनी अशा प्रकारांवर संताप व्यक्त केला आहे.
तज्ज्ञांच्या मते, अशा व्हिडिओंना मिळणारी लोकप्रियता हीच धोकादायक स्टंट्स वाढण्यामागील एक मोठी कारणे आहेत.