बापरे! धावत्या रेल्वेच्या छतावर स्केटिंग करत होता तरुण,पुढच्या क्षणी कोसळला खाली; पाहा थरारक VIDEO | Train Sketing Viral Video

Train Sketing Viral Video:आजकाल सोशल मीडियावर व्हायरल होण्याची क्रेझ वाढत चालली आहे. रील, शॉर्ट व्हिडीओ आणि लाइक्ससाठी अनेकजण मर्यादा ओलांडून जीवाची बाजी लावत आहेत. काही वेळा हे व्हिडीओ पाहून थक्क व्हायला होतं, तर काही वेळा अंगावर काटा येईल असे प्रसंग समोर येतात. ट्रेंडमध्ये राहण्यासाठी, ‘व्ह्युज’ मिळवण्यासाठी आणि एका रात्रीत प्रसिद्ध होण्यासाठी चाललेली ही धाव आता थेट जीवावरच बेतू लागली आहे. अशाच एका धडकी भरवणाऱ्या स्टंटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ धावत्या ट्रेनच्या छतावर स्केटिंग करणाऱ्या एका व्यक्तीचा असल्याचे दिसते. बाजूने दुसरी ट्रेन जात असताना कुणीतरी हा प्रसंग मोबाईलवर शूट केला आहे. व्हिडीओमध्ये तो माणूस वेगात धावणाऱ्या ट्रेनच्या छतावर अत्यंत धोकादायक पद्धतीने स्केटिंग करताना दिसतो. काही सेकंद सर्व सुरळीत दिसतं… पण, क्षणार्धात प्रसंग पलटतो. स्केटिंग करताना त्याचा तोल जातो, पाय उलटे फिरतात आणि तो ट्रेनच्या छतावरून खाली कोसळतो. हा क्षण पाहून व्हिडीओ बघणाऱ्यांच्या अंगावर काटा येईल.

हा प्रकार खरा आहे की AI जनरेटेड यावरही सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे. पण एक गोष्ट मात्र नक्की, व्हायरल स्टंट्ससाठी जीव धोक्यात घालण्याची ही स्पर्धा आता अत्यंत धक्कादायक झाली आहे.या व्हिडीओवर प्रेक्षकांनी संताप, चीड आणि नाराजी व्यक्त करत प्रतिक्रिया दिल्या आहेत. एकाने म्हटले, “झाली हौस पूर्ण, रीलसाठी जीव धोक्यात घालवायची…, माहिती नाही, लोकांना आपल्या जीवाची किंमत का नाही”; तर दुसऱ्याने म्हटले, “भावा, मला तर हा व्हिडीओ AI जनरेटेड वाटतो आहे.”

पाहा व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तर तिसऱ्याने म्हटले, “घ्या, आत्म्याला शांती मिळाली” ; तर काहींनी मजेत म्हटले, “रेस कुठे लावता आहेत, ज्याच्याशी स्पर्धाच नाही.”दरवेळी व्हायरल होणारे प्रत्येक स्टंट कूल नसतात. असे धोकादायक स्टंट स्वत:च्या जीवावर तर बेततातच, पण इतरांनाही धोक्यात आणतात. सोशल मीडियावर प्रसिद्धी हवी म्हणून लोकं रिस्क घेतात, पण त्यातून जीव गमावण्याची शक्यता किती प्रचंड आहे हे मात्र ते विसरतात.

अशा व्हिडीओंना मिळणाऱ्या व्ह्युजमुळे इतर तरुणांनाही प्रेरणा मिळू शकते, पण ती प्रेरणा चुकीच्या दिशेने नेणारी ठरू नये, हीच खरी चिंता आहे. हा व्हिडीओ आणि त्यावर आलेल्या प्रतिक्रिया एक गोष्ट स्पष्ट करतात; काळ बदलला, तंत्रज्ञान बदलले, पण माणसाने स्वतःच्या जीवाची किंमत समजून घेणे अजूनही तितकेच महत्त्वाचे आहे. सोशल मीडियाफेम काही वेळापुरता असतो, चुकीच्या स्टंटचा परिणाम कायमस्वरूपी असू शकतो!

व्हायरल व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment