वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार Traffic Challan Scheme

Traffic Challan Scheme: महाराष्ट्र्र सरकार नवीन चलन माफी योजना आणण्याचा विचार करत आहे. यामुळे वाहन मालक जुन्या दंडासह नवीन दंडाच्या पावत्यांची रक्कम एकाचवेळी भरू शकणार आहेत.

वाहने जशी वाढत आहेत तसे रस्ते अपुरे पडत आहेत, अपघात होत आहेत. त्यातच नियमही मोडले जात आहेत. महाराष्ट्रात सुमारे २५०० कोटी रुपयांची दंडाची चलन वाहन मालकांनी भरलेली नाहीत. यामुळे राज्य सरकार चलन येताच भरल्यास मोठा डिस्काऊंट देण्याच्या विचारात आहे.

महाराष्ट्र्र सरकार नवीन चलन माफी योजना आणण्याचा विचार करत आहे. यामुळे वाहन मालक जुन्या दंडासह नवीन दंडाच्या पावत्यांची रक्कम एकाचवेळी भरू शकणार आहेत. राज्यभरात असे 2500 कोटी रुपयांची चलन न भरताच पडून आहेत.

गणेशोत्सवानिमित्त राज्यातील सर्व वाहनांना टोल फ्री,शासन निर्णय जारी ! पास येथे डाऊनलोड करा Ganpati Festival Toll free Pass

लोकअदालतमधून नोटीस देऊनही ही चलन भरली गेलेली नाहीत. यामुळे राज्य सरकारला एकीकडे लाडकी बहीण योजनेमुळे गंगाजळीची गरज असताना ही पेंडिंग चलन भरून घेतल्यास महसूल जमा होऊ शकतो असे वाटत आहे.

एकट्या मुंबईतच १००० कोटी रुपयांची चलन न भरलेली आहेत. ही ट्रॅफिक चलन माफी योजना परिवहन सचिवांकडे पुनरावलोकनासाठी सादर करण्यात आली आहे. थकीत चलन भरली गेली तर मोठा महसूल जमा होणार आहे.

शिवाय भविष्यात नवीन चलन आले आणि जर ते १५ दिवसांत भरले तर त्या वाहन चालकाला त्या चलनातील दंडावर २५ ते ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम माफ केली जाणार आहे.

प्रस्तावित योजनेची रचना बजेट आणि कमी किमतीच्या वाहनांच्या मालकांना अधिक दिलासा देण्यासाठी केली जाणार आहे, असे सूत्रांनी सांगितले आहे.

मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत नविन पदभरती; लगेच करा अर्ज!Mumbai High Court Recruitment 2025

लक्झरी किंवा उच्च दर्जाच्या वाहनांच्या मालकांना ही सूट कमी प्रमाणावर असणार आहे. यामुळे दुचाकी, तीन चाकी, छोट्या कार मालकांना मोठा दिलासा मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे ही सूट जर चलन लवकर आले तरच मिळणार आहे.

अनेकदा वाहन मालकांना थेट लोकअदालतीच्याच मोबाईलवर नोटीस मिळत आहेत. त्यांना नियम मोडल्याचे आपल्या गाडीवर चलन आले आहे हे माहिती देखील नसते.

यामुळे या माफीचा लाभ वाहन मालकांना देण्यासाठी तसेच ही चलन थकीत राहू नयेत म्हणून परिवाहन खात्याला वेळेवर चलन पाठवावे लागणार आहे.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment