Talathi Recruitment 2025 : राज्याला सर्वाधिक महसूल मिळवून देणाऱ्या महसूल विभागात तलाठ्यांच्या हजारो पदांची रिक्तता गेल्या काही वर्षांपासून भासत आहे.
सध्या एका तलाठ्याकडे तीन ते पाच गावांचा कारभार असल्याने कामाचा ताण वाढला आहे. मात्र, डिसेंबरअखेर राज्यभरात तलाठ्यांच्या १७०० पेक्षा अधिक पदांची भरती होणार असून त्यामुळे महसूल प्रशासनातील कामकाज अधिक सुलभ आणि गतिमान होणार आहे.
महसूल सेवकांना तलाठी भरतीत राखीव जागा
महसूल सेवकांना या भरती प्रक्रियेत राखीव कोटा देण्यात येणार आहे. महसूल विभागाच्या अंतर्गत काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना सेवा अनुभवाच्या आधारे संधी दिली जाणार असल्याने त्यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे.
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या तरुणांना दिलासा
३ ते ५ गावांचा कारभार एका तलाठ्याकडे सध्या आहे…
दरवर्षी हजारो विद्यार्थी तलाठी भरतीसाठी अभ्यास करतात. मात्र, गेल्या दोन वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर भरती न झाल्याने उमेदवारांमध्ये नाराजी होती. नव्या भरतीच्या निर्णयामुळे या तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. विशेषतः ग्रामीण भागातील विद्यार्थी या भरतीकडे आशेने पाहत
डिसेंबरअखेरीस तलाठ्यांची १७०० पदे भरणार
राज्य शासनाने महसूल विभागातील रिक्त तलाठी पदे भरण्याची तयारी सुरू केली आहे.
महसूल विभागाच्या वरिष्ठ
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर २०२५ अखेरीस या भरती प्रक्रियेला सुरुवात होईल.
राज्यातील सर्व जिल्ह्यांतील रिक्त पदांचे आकडे निश्चित झाले असून मंजुरी प्रक्रियाही अंतिम टप्यात आहे.
नागरिकांची कामे वेगाने मार्गी लागणार
नवीन तलाठी रुजू झाल्यानंतर महसूल विभागातील कामकाजाचा वेग वाढेल. नागरिकांना ७/१२ उतारे, प्रमाणपत्रे, जमीन मोजणी, वारस नोंदी यांसारखी कामे वेळेत मिळतील. विशेषतः डिजिटल महसूल सेवांच्या अंमलबजावणीला गती मिळेल.