T20 World Cup 2026 Squads Full List : आयसीसी टी20 वर्ल्डकप 2026च्या पार्श्वभूमीवर क्रिकेटविश्वात प्रचंड हालचाल सुरू झाली आहे. भारत आणि श्रीलंका यांच्या संयुक्त यजमानपदाखाली होणारा हा क्रिकेट महाकुंभ आता फार दूर नाही. स्पर्धेची सुरुवात 7 फेब्रुवारी 2026 पासून होणार असून, अंतिम सामना 8 मार्च रोजी खेळवला जाणार आहे. जसजसा वर्ल्डकप जवळ येत आहे, तसतशी संघांकडून आपल्या-आपल्या स्क्वाडची घोषणा करण्याची प्रक्रिया वेग घेत आहे.
या टी20 वर्ल्ड कपमध्ये एकूण 20 संघ सहभागी होणार आहेत. या सर्व संघांना प्रत्येकी पाच संघ असलेल्या चार गटामध्ये विभागण्यात आले आहे. गट फेरी संपल्यानंतर प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर-8 फेरीत प्रवेश करतील. सुपर-8 टप्प्यात आठ संघांचे दोन गट केले जातील आणि त्यातून प्रत्येक गटातील टॉप-2 संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील.
त्यानंतर अंतिम फेरीत पोहोचलेल्या संघांमध्ये 8 मार्च रोजी विजेतेपदासाठी अंतिम सामना रंगणार आहे. दरम्यान, ICC Men’s T20 World Cup 2026 साठी सहभागी संघांपैकी कोणत्या संघांनी आतापर्यंत आपले स्क्वाड जाहीर केले आहेत, याकडे क्रिकेट चाहत्यांचे विशेष लक्ष लागून राहिले आहे.
ग्रुप A
टीम इंडिया (India Squad ICC Men’s T20 World Cup 2026) : सूर्यकुमार यादव (कर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रिंकू सिंग.
अमेरिका (USA Squad T20 World Cup 2026) : अजून तरी संघाची घोषणा झाली नाही…
नामिबिया (Namibia Squad T20 World Cup 2026) : अजून तरी संघाची घोषणा झाली नाही…
नेदरलँड्स (Netherlands Squad T20 World Cup 2026) : अजून तरी संघाची घोषणा झाली नाही…
पाकिस्तान (Pakistan Squad T20 World Cup 2026) : अजून तरी संघाची घोषणा झाली नाही…
ग्रुप B
ऑस्ट्रेलिया (Australia Squad T20 World Cup 2026) : मिचेल मार्श (कर्णधार), झेवियर बार्टलेट, कूपर कॉनोली, पॅट कमिन्स, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, नाथन एलिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मॅथ्यू कुहनेमन, ग्लेन मॅक्सवेल, मॅथ्यू शॉर्ट, मार्कस स्टोइनिस आणि अॅडम झांपा.
श्रीलंका (Sri Lanka Squad T20 World Cup 2026) : दासुन शनाका (कर्णधार), पथुम निसांका, कुसल मेंडिस, कामिल मिश्रा, कुसल परेरा, धनंजया डी सिल्वा, निरोशन डिकवेला, जेनिथ लियानागे, चारिथ असलंका, कामिंदू मेंडिस, पवन रथनायके, सहान अरचिगे, वानिंदू हसरंगा, दुनिथ वेललागे, मिलन रथनायके, नुवान तुषारा, इशान मलिंगा, दुष्मंथा चमीरा, प्रमोद मदुशन, मथीशा पाथिराना, दिलशान मदुशांका, महेश थेक्षाना, दुशान हेमंथा, विजयकांत व्यासविना, विजयकांत व्यास.
झिम्बाब्वे(Zimbabwe Squad T20 World Cup 2026) : अजून तरी संघाची घोषणा झाली नाही…
आयर्लंड (Ireland Squad T20 World Cup 2026) : अजून तरी संघाची घोषणा झाली नाही…
ओमान (Oman Squad T20 World Cup 2026) : जतिंदर सिंग (कर्णधार), विनायक शुक्ला, मोहम्मद नदीम, शकील अहमद, हम्माद मिर्झा, वसीम अली, करण सोनावले, शाह फैसल, नदीम खान, सुफयान महमूद, जय ओडेदरा, शफिक जान, आशिष ओडेदरा, जितेन रामानंदी, हसनैन अली शाह.
ग्रुप C
इंग्लंड (England Squad T20 World Cup 2026) : हॅरी ब्रुक (कर्णधार), रेहान अहमद, जोफ्रा आर्चर, टॉम बँटन, जेकब बेथेल, जोस बटलर, सॅम करन, लियाम डॉसन, बेन डकेट, विल जॅक्स, जेमी ओव्हरटन, आदिल रशीद, फिल साल्ट, जोश टोंगे, ल्यूक वूड.
वेस्ट इंडिज (West Indies Squad T20 World Cup 2026) : अजून तरी संघाची घोषणा झाली नाही…
बांगलादेश (Bangladesh Squad T20 World Cup 2026) : अजून तरी संघाची घोषणा झाली नाही…
इटली (Italy Squad T20 World Cup 2026) : अजून तरी संघाची घोषणा झाली नाही…
नेपाळ (Nepal Squad T20 World Cup 2026) : अजून तरी संघाची घोषणा झाली नाही…
ग्रुप D
अफगाणिस्तान (Afghanistan Squad ICC Men’s T20 World Cup 2026) : राशिद खान (कर्णधार), नूर अहमद, अब्दुल्ला अहमदझाई, सेदीकुल्ला अटल, फजलहक फारुकी, रहमानउल्ला गुरबाज, नवीन उल हक, मोहम्मद इशाक, शाहिदुल्ला कमाल, मोहम्मद नबी, गुलबदिन नायब, अजमतुल्ला उमरझाई, मुजीब उर रहमान, दरविश रसूली, इब्राहिम जद्रान.
दक्षिण आफ्रिका (South Africa Squad T20 World Cup 2026) : अजून तरी संघाची घोषणा झाली नाही…
न्यूझीलंड (New Zealand Squad T20 World Cup 2026) : अजून तरी संघाची घोषणा झाली नाही…
कॅनडा (Canada Squad T20 World Cup 2026) : अजून तरी संघाची घोषणा झाली नाही…
यूएई (UAE Squad T20 World Cup 2026 ) : अजून तरी संघाची घोषणा झाली नाही…