अहाहा! सुप्रिया सुळे काय नाचल्या, युगेंद्र पवारांच्या लग्नात आत्याबाईंचा निळ्या साडीत अफलातून डान्स; फुगडी खेळताच…VIDEO व्हायरल Supriya Sule Dance Viral Video

Supriya Sule Dance Viral Video: मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलामधील जिओ सेंटरमध्ये ३० नोव्हेंबर रोजी पवार कुटुंबाचा मोठा आणि देखणा विवाह सोहळा रंगला. मागील काही दिवसांपासून या लग्नाची तयारी, पाहुण्यांची ये-जा आणि सेलिब्रिटींची उपस्थिती सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत होती. शरद पवारांचे नातू आणि सुप्रिया सुळे यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनी तनिष्का कुलकर्णी यांच्याशी सप्तपदी घेतली आणि या सोहळ्याची झळाळी पाहणाऱ्यांच्या नजरेस पडली.

वधू-वरांची एंट्री ते मिरवणुकीतील उत्साह सर्वच ठिकाणांवर आल्हाददायक आनंदाचे रंग उधळले गेले. मात्र, संध्याकाळचा खरा शोस्टॉपर ठरला तो सुप्रिया सुळे यांचा जंगी डान्स. नेहमी गंभीर राजकीय चर्चांमध्ये दिसणाऱ्या सुप्रियाताईंचा हा धमाल अवतार पाहून अनेक जण थक्क झाले.

वरातीत सुप्रिया सुळेची एनर्जी पाहण्यासारखी!

वरातीत ढोल-ताशांची ताल लय धरू लागली, तशी सुप्रियाताईंची पावलं आपोआप नृत्यभावनेत रंगली. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये त्या आनंदाने नाचताना दिसतात. निळ्या रंगाची पारंपरिक साडी, सुंदर केसांचा जूडा व लखलखीत हास्य यांच्या संपूर्ण लूकने लोकांचे लक्ष वेधून घेतले.

इतकेच नव्हे, तर त्यांनी इतर महिलांसोबत फुगडीही खेळली आणि आजूबाजूचे उपस्थित पाहुणे टाळ्यांचा कडकडाट करीत त्यांच्या उत्साहात सामील झाले. अनेकांनी त्यांच्या या अवताराला “नेहमीपेक्षा १० पट अधिक एनर्जेटिक”, “क्यूट मोमेंट”, “डान्स क्वीन ऑफ दे डे” अशी कमेंट दिली.

विडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

कौटुंबिक एकत्रतेचा सुंदर क्षण

पवार कुटुंबात राजकीय मतभेद असले तरी कुटुंब म्हणजे कुटुंब हे पुन्हा एकदा या कार्यक्रमात दिसून आले. शरद पवार, सुप्रिया सुळे, अजितदादा पवार यांचे राजकीय मार्ग भिन्न असले तरी कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये ते नेहमीच एकत्र दिसतात. समोर आलेल्या माहितीनुसार, अजित पवार हे स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या प्रचारामुळे विवाहसोहळ्यात उपस्थित राहू शकले नाहीत. मात्र, कुटुंबीयांनी त्यांच्या अनुपस्थितीतही सोहळा आनंदात पार पाडला.

हेही वाचा

सोशल मीडियावर चर्चा रंगली

लग्नातील फोटोज व व्हिडीओ सुप्रिया सुळे यांनी स्वतः सोशल मीडियावर शेअर केले. काही तासांतच हे क्षण हजारोंनी शेअर केले गेले. चाहते आणि नेटकर्‍यांनी त्यांच्या डान्सची भरभरून प्रशंसा केली. “नेहमीच गंभीर विषयांवर बोलणाऱ्या सुप्रियाताईंना असं नाचताना पाहून आनंद झाला,” अशा अनेक कमेंट्स दिसल्या.

येथे पाहा व्हिडीओ

Leave a Comment