राज्य कर्मचाऱ्यांच्या संदर्भात सरकारकडून मोठा महत्वपुर्ण निर्णय ; जाणून घ्या सविस्तर! State Employees Update

State Employees Update:राज्य सरकारने अखेर राज्यातील कर्मचाऱ्यांच्या सेवाज्येष्ठता आणि पदोन्नती संदर्भातील मोठा महत्वाचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून निर्माण झालेला गोंधळ संपुष्टात येणार असून, हजारो कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

सरकारकडून जारी करण्यात आलेल्या नव्या आदेशानुसार, कर्मचाऱ्यांना पदोन्नती देताना कोणती दिनांक सेवाज्येष्ठतेसाठी ग्राह्य धरायची याबाबत स्पष्ट नियम घालून देण्यात आले आहेत. यामध्ये प्रामुख्याने दिनांक २५ एप्रिल २००४ पूर्वी राज्य शासन सेवेत रुजू झालेले आणि विभागीय स्पर्धा परीक्षेद्वारे पदोन्नती मिळवलेले कर्मचारी यांचा समावेश आहे.

लाडक्या बहिणींनो; ऑगस्ट महिन्याची तारीख ठरली; या तारखेला जमा होणार ₹1500 ऑगस्ट महिन्याचा 13 वा हप्ता Ladki Bahin Yojana Insttalment Update

अशा कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आता त्यांच्या प्रथम नियुक्तीची तारीख हीच पुढील पदोन्नतीसाठी पात्र मानली जाणार आहे. यामुळे सेवाज्येष्ठतेच्या तारखेबाबत असलेला गोंधळ दूर होईल. या निर्णयाचा लाभ फक्त शासन सेवेतीलच नव्हे तर पोलिस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनाही होणार आहे.

यापूर्वी, शासनाच्या २७ मे २०२१ च्या निर्णयानुसार सेवाज्येष्ठता ही संबंधित पदोन्नती मिळालेल्या तारखेपासून लागू केली जात होती. मात्र, परीक्षा उत्तीर्ण होण्याची तारीख आणि पदोन्नती लागू होण्याच्या प्रक्रियेत निर्माण झालेल्या विसंगतीमुळे अनेक प्रकरणांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता.

राज्य कर्मचारी व पेन्शन धारकांना ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतनात चार आर्थिक लाभ ; जाणून घ्या सविस्तर ! State Employees Salary Hike

आता नव्या आदेशानुसार, २५ एप्रिल २००४ अथवा त्यापूर्वी सेवेत रुजू झालेले व त्यानंतर विभागीय परीक्षा उत्तीर्ण होऊन वरिष्ठ पदावर पोहोचलेले कर्मचारी यांची सेवाज्येष्ठता ही २५ एप्रिल २००४ पासूनच धरली जाईल. तर, २५ एप्रिल २००४ नंतर रुजू झालेले आणि विभागीय परीक्षा उत्तीर्ण झालेले कर्मचारी यांची सेवाज्येष्ठता ही त्यांच्या प्रथम नियुक्ती दिनांकापासून मोजली जाणार आहे.

या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांना थेट फायदा होऊन पदोन्नती प्रक्रियेत पारदर्शकता व स्पष्टता निर्माण होणार आहे.

महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment