अधिकारी कर्मचाऱ्यांना सुधारित दर प्रमाणे अतिकालिक भत्ता ,पारिश्रमिक भत्ता ,आहारभत्ता , TA / DA बाबत शासन निर्णय..State Employees TA DA Allowance

State Employees TA DA Allowance :भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारितीत लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक/पोट निवडणूकांच्या कामासाठी नियुक्त करण्यात येणा-या अधिकारी/कर्मचारी यांना द्यावयाचे पारिश्रमिक / मानधन, अतिकालिक भत्ता / निवडणूक भत्ता इत्यांदीचे दर शासनाच्या संदर्भाधीन क्र. १ ते ४ येथील शासन निर्णयांन्वये निश्चित केलेले आहेत.

भारत निवडणूक आयोगाने त्यांचे संदर्भाधीन क्र.५ व ६ येथील दि.०८.०८.२०२५ रोजीच्या पत्रांन्वये निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त करावयाच्या अधिकारी/कर्मचारी यांना द्यावयाचे पारिश्रमिक / मानधन, अतिकालिक भत्ता / निवडणूक भत्ता इ. दरांमध्ये सुधारणा करण्याबाबत निर्देश दिले आहेत.

भारत निवडणूक आयोगाच्या सदर पत्रातील सूचनांना अनुसरुन भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारितीतील राज्यातील आगामी लोकसभा/विधानसभा निवडणुकांच्या कर्तव्यार्थ नियुक्त करण्यात येणा-या निवडणूक अधिकारी/कर्मचारी यांना द्यावयाचे पारिश्रमिक / मानधन, अतिकालिक भत्ता / निवडणूक भत्ता इत्यादीच्या अनुषंगाने सुधारणा करण्याचे शासनाच्या विचाराधीन होते. त्यानुसार पुढीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

शासन निर्णय :-

भारत निवडणूक आयोगाच्या पत्र क्र.४६४/INST/EPS/२०२५/Remuneration & TA/DA, दि.०८.०८.२०२५ व पत्र क्र.४६४/INST/EPS/२०२५/Honorarium, दि.०८.०८.२०२५ अन्वये देण्यात आलेल्या सूचनांना अनुसरुन भारत निवडणूक आयोगाच्या अखत्यारितीतील महाराष्ट्र राज्यातील आगामी लोकसभा/विधानसभा सार्वत्रिक/पोट निवडणूकांच्या कामासाठी नियुक्त करण्यात येणारे अधिकारी/कर्मचारी यांना द्यावयाचे पारिश्रमिक /मानधन, अतिकालिक भत्ता / निवडणूक भत्ता इत्यादीबाबत पुढीलप्रमाणे सुधारित दर मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात येत आहे:-

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment