राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी 02 जानेवारी 2026 रोजीचे 04 महत्त्वाचे शासन निर्णय.State Employees Shasan Nirnay GR

राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांसाठी 02 जानेवारी 2026 रोजीचे 04 महत्त्वाचे शासन निर्णय.State Employees Shasan Nirnay GR

State Employees Shasan Nirnay GR:राज्य शासनाने दिनांक 02 जानेवारी 2026 रोजी राज्य अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संदर्भात चार महत्त्वाचे शासन निर्णय (GR) जाहीर केले आहेत. या निर्णयांचा थेट परिणाम विविध विभागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर होणार आहे. सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे –

मोठी बातमी ठाकरेंची सेना आणि शिंदेंची सेना 69 जागांवर आमने-सामने, 97 ठिकाणी भाजप-ठाकरे भिडणार! संपूर्ण यादी पहा. BMC Election Update

1) स्थानापन्न पदोन्नतीबाबत निर्णय

भारतीय वन सेवेतील अधिकाऱ्यांना निवडश्रेणीत स्थानापन्न पदोन्नती देण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. हा निर्णय महसूल व वन विभागामार्फत 01 जानेवारी 2026 रोजी जाहीर करण्यात आला आहे.

2) सार्वजनिक बांधकाम विभाग – ज्येष्ठतासूची

सार्वजनिक बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता (विद्युत) या संवर्गाची 01 जानेवारी 2026 रोजीची तात्पुरती ज्येष्ठतासूची प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी ही यादी तपासावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

मोठी बातमी राज्यात 9,720 शिक्षक पदांची मेगा भरती! सविस्तर अपडेट पहा.Teacher Recruitment 2026

3) NPS मधून UPS मध्ये स्थलांतराबाबत

राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना (NPS) मधून एकीकृत निवृत्तीवेतन योजना (UPS) मध्ये स्थलांतर केलेल्या अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या मासिक अंशदानाची कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे. यास सामान्य प्रशासन विभागाने शासन मान्यता दिली आहे.

4) सहकार विभाग – पदनाम व भरतीबाबत निर्णय

राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाच्या आस्थापनेवरील सांख्यिकी अधिकारी हे पदनाम बदलून आता “Software Support Engineer” असे करण्यात आले आहे. हे पद बाह्यस्त्रोताद्वारे कंत्राटी पद्धतीने किंवा महाआयटी (MahaIT) मार्फत भरण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment