State Employees Salary March 2026:मार्च 2026 च्या वेतनासोबत महागाई भत्ता फरक अदा करणेबाबत शिक्षण संचालक यांच्या मार्फत दिनांक 07.04.2026 रोजी महत्वपुर्ण परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे .
सदरचे परिपत्रक हे शिक्षणाधिकारी ( माध्यिमक / प्राथमिक ) सर्व , शिक्षण निरीक्षक मुंबई , अधिक्षक वेतन व भनिनि पथक ( माध्यमिक ) सर्व यांच्या प्रति सादर करण्यात आले आहेत .
तसेच दिनांक 01.07.2025 पासुन महागाई भत्ताच्या दरात सुधारणा करण्यात आली असून , माहे जुलै 2025 ते ऑक्टोंबर 2025 या कालावधीतील थकबाकी मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करणेबाबत निर्देश आहेत , तदनुसार कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .
तसेच शासन निर्णय निर्गमित होणेपुर्वी ज्या जिल्ह्यांचे माहे फेब्रुवारी 2026 चे वेतन कोषागारात पारित झाले होते , अशा जिल्ह्यातील शिक्षक / शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे माहे फेब्रुवारी 2026 या एक महिन्याच्या देय महागाई भत्ता फरक माहे मार्च 2026 या महिन्यात रोखीने अदा करण्यात यावा असे नमुद करण्यात आले आहेत .
विषय-
माहे मार्च २०२६ चे वेतन महागाई भत्ता फरकासह अदा करणे बाबत.
संदर्भ
१. शासन निर्णय वित्त विभाग क्र. मभवा-१३२५/प्र.क्र/१९/सेवा-०९/दि.२५/०२/२०२६
२. शासन पत्र संकिर्ण२४१९//प्र.क्र४२/अर्थसंकल्प/दि.२५/०२/२०२६
३. मा आयुक्त (शिक्षण) यांचे पत्र अंदाज २०१ महागाई भत्ता/आय/१७४५८५४/२६ दि.२६/०२/२०२६
महाराष्ट्र शासनाच्या संकेत स्थळावर विषयांकित प्रकरणी शासन निर्णय उपलब्ध आहे. दि.०१/०७/२०२५ पासून महागाई भत्याच्या दरात सुधारणा करण्यात आली असून माहे जूलै २०२५ ते ऑक्टोबर २०२५ या कालावधीतील थकबाकी मार्च २०२६ या महिण्यात रोखीने अदा करणे बाबत निर्देश आहेत तदनुसार कार्यवाही करण्यात यावी.
संदर्भ शासन निर्णय निर्गमित होणे पुर्वी ज्या जिल्हयांचे माहे फेबुवारी २०२६ चे वेतन कोषागारात पारित झाले होते अशा जिल्हयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे माहे फेबुवारी २०२६ या एक महिण्याचा देय महागाई भत्ता फरक मार्च २०२६ या महिण्यात रोखीने अदा करण्यात यावा.
