State Employees Salary Hike News:राज्य कर्मचाऱ्यांसाठी पगारात 15% वाढ: महत्त्वाचे परिपत्रक जारी
वित्त विभागामार्फत दि. 08 डिसेंबर 2025 रोजी एक महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आले आहे. या परिपत्रकानुसार आदिवासी विकास विभागांतर्गत कार्यरत असलेले आश्रमशाळा शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, जर ते नक्षलग्रस्त किंवा अतिसंवेदनशील विभागात सेवेत असतील, तर त्यांना मुळ वेतनाच्या 15 टक्के प्रोत्साहन भत्ता देण्यात येणार आहे. या भत्त्याची किमान मर्यादा 200 रुपये, तर कमाल मर्यादा 1500 रुपये अशी निश्चित करण्यात आली आहे.
कोषागार व उपकोषागार कार्यालयांना हा भत्ता नियमितपणे मंजूर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. हा प्रोत्साहन भत्ता सातवा किंवा सहावा वेतन आयोगातील मुळ वेतनावर आधारित असेल. म्हणजेच, संबंधित वेतन आयोगानुसार मिळणाऱ्या मुळ वेतनाच्या 15% इतका भत्ता, निर्धारित मर्यादेत कर्मचाऱ्यांना दरमहा मिळेल.
परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्त्वाची बाब म्हणजे हा लाभ फक्त नक्षलग्रस्त किंवा अतिसंवेदनशील क्षेत्रात मुख्यालय असणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच लागू राहील. इतर क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सदर भत्ता लागू असणार नाही. त्यामुळे या विशेष क्षेत्रांत अत्यंत आव्हानात्मक परिस्थितीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अतिरिक्त आर्थिक प्रोत्साहन मिळणार आहे.
या निर्णयामुळे आदिवासी विकास विभागातील अनेक शिक्षक व कर्मचाऱ्यांना दिलासा मिळणार असून, जे कमी मुळ वेतनामुळे कमी प्रोत्साहन भत्ता घेत होते, त्यांना आता प्रति महिना 1500 रुपयांपर्यंत वाढ मिळू शकते. तसेच, भत्ता देय असल्यास प्रोत्साहन भत्ता फरकाची रक्कमही मंजूर करण्यात येणार आहे.
या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या वेतनात थेट वाढ होऊन त्यांचा आर्थिक भार कमी होईल आणि आव्हानात्मक क्षेत्रांमध्ये कार्य करण्यासाठी प्रोत्साहन मिळेल.