State Employees Salary Hike:राज्यातील कर्मचारी तसेच पेन्शन धारकांना ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन / पेन्शन देयकासोबत चार मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत.
राज्य सरकारी कर्मचारी / पेन्शन धारकांना माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर वेतन तसेच पेन्शन देयकासोबत मोठे आर्थिक लाभ मिळणार आहेत . यांमध्ये पगार वाढ व डी.ए वाढीसह फरकाचा समावेश आहे.
महागाई भत्ता वाढ : राज्य सरकारच्या वित्त विभाग मार्फत नुकतेच निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार , राज्य सरकारी कर्मचारी तसेच पेन्शन धारकांच्या डी.ए मध्ये केंद्र सरकारच्या धर्तीवर 53 टक्के वरुन 55 टक्के अशी वाढ लागु करण्यात आलेली आहे.
सदर महागाई भत्ता वाढ माहे ऑगस्ट वेतन देयक तसेच पेन्शन देयकासोबत दिनांक 01.01.2025 पासुन डी.ए फरकासह लागु करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत . यामुळे राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना डी.ए वाढीसह जानेवारी ते जुलै असे एकुण 07 महिन्यांचा डी.ए फरक मिळणार आहे .
वेतनवाढ : दरवर्षी राज्य कर्मचाऱ्यांना माहे जुलै महिन्यात वार्षिक वेतनवाढ लागु केली जाते ,परंतु वेतनवाढीचे आदेश तयार होई पर्यंत माहे ऑगस्ट महिना लागुन जातो . यामुळे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर महिन्यात वार्षिक वेतनवाढीसह जुलै महिन्यांचा वेतनवाढ फरक अदा केला जाईल .
अशा प्रकारे राज्य कर्मचारी / पेन्शन धारकांना माहे ऑगस्ट पेड इन सप्टेंबर महिन्यांच्या वेतन / पेन्शन देयकासोबत वरी नमुद 04 आर्थिक लाभ मिळणार आहेत.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा