राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या बाबत निर्गमित झाले 05 मोठे महत्वाचे शासन निर्णय ( GR ). State Employees New GR 2026

State Employees New GR 2026:राज्य अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दि.04.02.2026 रोजी 05 मोठे महत्वपुर्ण शासन निर्णय ( GR ) निर्गमित करण्यात आले आहेत .

01.कनिष्ठ अभियंता ज्येष्ठतायादी : कनिष्ठ अभियंता ( स्थापत्य ) या संवर्गाच्या दिनांक 01.01.2022 रोजीच्या ज्येष्ठतायादी बाबतचे शुद्धीपत्रक दि.04.02.2026 रोजी निर्गमित करण्यात आले आहेत .

02.उर्जा , उद्योग , कामगार व खनिकर्म विभाग : संचालक , बाष्पके संचालनालय , मुंबई यांचे आस्थापनेवारील अधिकारी / कर्मचारी यांचेकरीता शिस्तभंगविषयक कारवाईच्या अनुषंगाने सक्षम प्राधिकारी घोषित करणेबाबत निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत .

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

03.जलसंपदा विभाग : दिनांक 01.11.2005 पुर्वी पदभरतीची जाहीरात / अधिसुचना निर्गमित झालेल्या प्रकरणी शासन सेवेत दिनांक 01.11.2005 रोजी अथवा त्यानंतर रुजु झालेल्या राज्य शासकीय अधिकारी / कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागु करणेबाबत निर्णय निर्गमित करण्यात आला आहे .

04.विभागीय आयुक्त : विभागीय आयुक्त यांच्या कार्यालय करीता मंजूर अस्थायी पदे पुढे चालु ठेवणेबाबत ग्राम विकास विभाग मार्फत दि.04.03.2026 रोजी निर्णयानुसार मंजूरी देण्यात येत आहे .

05.महसुली विभाग वाटप करुन नियमित पदस्थापना : एकत्रित परिविक्षाधीन प्रशिक्षण कार्यक्रम -09 अंतर्गत परिविक्षाधिन कौशल्य विकास , रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन अधिकारी , गट ब ( राजपत्रित ) यांना महसुली विभाग वाटप करुन नियमित पदस्थापना देणेबाबत दि.04.03.2026 रोजी निर्णयानुसार मंजूरी देण्यात येत आहे .

शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment