State Employees Allowance 2025:राज्य शासनाकडून सरकारी कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या पगारात एक मोठा दिलासा दिला जाणार आहे. या महिन्याच्या वेतन आणि पेन्शन देयकासोबत कर्मचारी आणि निवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक फायदा मिळणार आहे.
7th pay commission update : ड्रेस भत्त्यात सरकारचा मोठा बदल, आता नवीन नियम लागू होणार
सुधारित वेतनश्रेणीचा लाभ
राज्य सरकारने 104 संवर्गातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा लाभ 1 जानेवारी 2016 पासून लागू असून, तो जून महिन्याच्या पगारात प्रत्यक्षरित्या दिला जाणार आहे. म्हणजेच, जुन महिन्याच्या वेतनात याचा फरक समाविष्ट असेल.
महागाई भत्ता वाढण्याची शक्यता
केंद्र सरकारप्रमाणे राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता (DA) देखील वाढवण्याची शक्यता आहे. हा वाढीव डीए जूनच्या पगारात मिळू शकतो, ज्यामुळे कर्मचार्यांच्या हाती अधिक रक्कम येणार आहे.
डीए वाढीबाबत लवकरच निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार 2 टक्क्यांनी महागाई भत्ता वाढवण्याचा निर्णय घेणार असून, यासंबंधीचा अधिकृत आदेश महिन्याच्या अखेरीस येण्याची शक्यता आहे. हा वाढीव डीए 1 जानेवारी 2025 पासून लागू करण्यात येणार आहे आणि त्या कालावधीचा फरकही दिला जाईल.
निवृत्त कर्मचाऱ्यांनाही फायदा
हा डीए वाढ निवृत्त कर्मचाऱ्यांनाही लागू होणार असून, त्यांनाही 1 जानेवारी 2025 पासूनचा फरक मिळेल.