State Employees 9th Allowance Hike 2025:सामान्य प्रशासन विभागातील राजशिष्टाचार उपविभागाच्या अधिनस्त असलेल्या राज्य अतिथीगृहातील अधिकारी/कर्मचारी यांच्या गणवेशाच्या वित्तीय मर्यादेत सुधारणा करण्याबाबत…
शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग क्रमांकः एसजीएच-१०११/प्र.क्र.१५४/३१, दिनांक १० सप्टेंबर, २०१४.
सामान्य प्रशासन विभागाच्या राजशिष्टाचार उपविभागाच्या अधिनस्त असलेल्या राज्य अतिथीगृहातील कर्मचाऱ्यांना पुरविण्यात यावयाच्या गणवेशाच्या वित्तीय मर्यादेत सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
शासन निर्णय:
सामान्य प्रशासन विभागातील राजशिष्टाचार उपविभागाच्या अधिनस्त असलेल्या राज्य अतिथीगृहातील अधिकारी/कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा, प्रती कर्मचारी एकूण तीन गणवेश खालील तक्त्यात नमूद केलेल्या सुधारित दराने मंजूर करण्यात येत आहे.
२. मागील पृष्ठावरील तक्त्यात नमूद केलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांना सुधारित गणवेश भत्ता हा यापूर्वी वेळोवळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयातील अटी व शर्तीच्या अधीन राहून मंजूर करण्यात येत आहे.
३. सह्याद्री व नंदगिरी राज्य अतिथीगृहातील कर्मचारी कार्यालयीन वेळेत नियमितरित्या गणवेश परिधान करण्यात येत असल्याची तपासणी व्यवस्थापक/सहायक व्यवस्थापक यांनी करावी.
४. हा शासन निर्णय, वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक-३४४९/व्यय-४, दिनांक १९ मे, २०२५ अन्वये मिळालेल्या सहमतीने निर्गमित करण्यात येत आहे.
4. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेताक २०२५०६२०१५२७१२८७०७असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने