SSC-HSC Borad Exam News: दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचीही सरमिसळ होणार आहे. प्रात्यक्षिक परीक्षेतही इतर शाळेतील विद्यार्थी परीक्षा घेतील.
दहावी-बारावीच्या परीक्षा अवघ्या काही दिवसात होणार आहे. दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नियोजन केले आहे. याचसोबत आता परीक्षेबाबत महत्त्वाचा निर्णय झाला आहे..
लेखी परीक्षेपूर्वी प्रात्यक्षिक परीक्षेतील नियमात बदल झाले आहेत. प्रात्यक्षिक परीक्षेतील बाह्य परीक्षकांची आता अदलाबदल केली जाणार आहे. आता खासगी शाळांवरील शिक्षण अनुदानित शाळेत तर तेथील शिक्षक इतर शाळांमध्ये परीक्षक म्हणून जाणार आहे. बाह्यपरीक्ष नेमण्याचा निर्णय बोर्डाने घेतला आहे.
बारावीची प्रात्यक्षिक परीक्षा २३ जानेवारी ते ९ फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. यानंतर १० फेब्रुवारीपासून लेखी परीक्षा १० फेब्रुवारीपासून होणार आहे. १०वीची प्रात्यक्षिक परीक्षा २ ते १८ फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. या कालावधीत शाळेत बाह्य परीक्षक येणार आहेत. ते प्रात्यक्षिक किंवा तोंडी परीक्षा घेणार आहेत.
पत्नीच्या नावावर प्रॉपर्टी तर मालक कोण, हायकोर्टाने दिला महत्वपूर्ण निर्णय.Wife Propertys News
बोर्डाच्या परीक्षेवेळी तर कोणत्याही प्रकराची कॉपी किंवा गैरप्रकार झाल्यास परीक्षा केंद्राची मान्यता कायमची रद्द केली जाणार आहे. यासाठी केंद्रा वॉल कंपाउंड, सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे.
लेखी परीक्षेतही शिक्षकांना दुसऱ्या शाळेत परीक्षण करणार
विद्यार्थ्यांची सरमिसळ झाल तर परीक्षा केंद्रांवर अनेक ठिकाणी कॉपी झाल्याचे आढळले आहे. त्यामुळे आता पर्यवेक्षकांचीही सरमिसळ करण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. याचसोबत प्रत्येक केंद्रावर सीसीटीव्ही कॅमेरे असणार आहे. तसेच पर्यवेक्षकांचेही कॅमेरे सुरु ठेवण्यास सांगितले आहे. जेणेकरुन परीक्षेतील हालचाली वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळतील.
महत्त्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा