खुशखबर 4860 क्रीडा शिक्षकांची पदांची भरती Sports Teacher Recruitment 2026
Sports Teacher Recruitment 2026:स्थानिक स्वराज्य संस्थांच्या उच्च प्राथमिक शाळांमध्ये मानधन तत्त्वावर अकरा महिन्यांसाठी क्रीडा शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या.
त्यानंतर आता राज्यातील केंद्र शाळांच्या स्तरावर क्रीडा शिक्षकांच्या पदाला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने नुकतीच मंजुरी दिली आहे. त्यामुळे क्रीडा शिक्षकांसाठी ही अत्यंत सकारात्मक बाब मानली जात आहे.
यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांची शारीरिक शिक्षणाची उपलब्धता व्यापक पातळीवर वाढेल, असा उद्देश समोर ठेवण्यात आला आहे. तसेच या निर्णयामुळे शाळांमध्ये क्रीडा व शारीरिक शिक्षणावर देखील अधिकचा भर देण्यात येणार असल्याचे सागण्यात आले आहे.
राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये शिक्षक संवर्गातील २ लाख ३६ हजार २२८ पदे पायाभूत पदे (प्राथमिक) निश्चित करण्यात आली आहेत.
राज्यातील समूह साधन केंद्रांची (केंद्र शाळा) २१ ऑगस्ट २०२५ रोजीच्या शासन निर्णयानुसार पुनर्रचना करण्यात आली. त्यानुसार राज्यात सद्यः स्थितीत ४ हजार ८६० समूह साधन केंद्र अस्तित्वात आहेत. १५ मार्च २०२४ च्या शासन निर्णयाद्वारे संचमान्यतेचे निकष
सकारात्मक बदलाची अपेक्षा
नव्या योजने अंतर्गत क्रीडा शिक्षक संवर्गाची ४ हजार ८६० पदे मंजूर करण्यात आली आहेत. ही पदे जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमध्ये भरली जाणार आहेत.
आतापर्यंत अनेक शाळांमध्ये नियमित शारीरिक शिक्षणासाठी योग्य शिक्षण उपलब्ध नव्हता, त्यामुळे हा निर्णय ग्रामीण तसेच शहरी भागातील शाळांमध्ये सकारात्मक बदल घडवेल, अशी अपेक्षा शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आली आहे.
२.३६ लाख पायभूत पदे करण्यात आली निश्चित
सुधारित करण्यात आले. त्यानुसार केंद्र स्तरावर प्रत्येकी एक याप्रमाणे क्रीडा शिक्षक संवर्गातील पद मंजूर करण्यात आले. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष क्रीडा शिक्षक हा ४ हजार ८६० पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण झाला आहे.
तर ८ ऑक्टोबर २०२४च्या शासन निर्णयानुसार केंद्रस्तरीय विशेष शिक्षक (दिव्यांग विद्यार्थी अध्यापन) संवर्गातील प्रत्येकी एक पद मंजूर करण्यात आले.