Soybean Bajar Bhav : राज्यभरातील विविध बाजार समित्यांमध्ये ७३ हजार ४३८ क्विंटल सोयाबीनची आवक (Soybean Arrival) नोंदवली गेली. सोयाबीनबाजारात आज मोठी उलाढाल झाली.
तब्बल ७३ हजार क्विंटल आवक (Soybean Arrival) होत असताना अनेक बाजारात पिवळ्या जातीच्या सोयाबीनला ५ हजार ५00 ते ५ हजार ९५० रुपयांपर्यंत चांगला भाव मिळाला. जालना, यवतमाळ, अकोला, नागपूर याठिकाणी दरात वाढ दिसून आली; तर लोकल आणि हायब्रीडलाही मागणी मिळाली.
आता सात दिवसांत मिळणार शेतरस्ता; शेतकऱ्यांना मोठा दिलासा Land Record Road
कोणत्या बाजारात किती आवक?
कारंजा – २०,००० क्विंटल (राज्यातील सर्वाधिक आवक)
अमरावती – ७,६६५ क्विंटल
यवतमाळ – २,३८८ क्विंटल
औराद शहाजानी – ३,१०५ क्विंटल
अकोला – ६,३१४ क्विंटल
जालना – १२,१६१ क्विंटल
जळकोट – १,०२० क्विंटल
माजलगाव – १,७१९ क्विंटल
आजचा बाजारभावाचा ट्रेंड
बाजारात सोयाबीनला ४,२०० ते ४,७०० या श्रेणीत स्थिर, उच्च गुणवत्तेला ५ हजारांहून अधिक दर मिळत आहेत.
पिवळ्या जातीला सर्वांत जास्त मागणी व सर्वाधिक दर.
अमरावती, माजलगाव, कारंजा याठिकाणी मोठी आवक परंतु मध्यम दर.
राज्यातील इतर बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक (Soybean Arrival) किती झाली आणि त्याला कसा दर मिळाला ते वाचा सविस्तर
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
शेतमाल : सोयाबिन
दर प्रती युनिट (रु.)
