सौरचलित फवारणी पंप योजना 2025 ऑनलाईन अर्ज सुरू– मोबाईलवरून अर्ज करा | Solar Powered Spray Pump Scheme 2025

Solar Powered Spray Pump Scheme 2025:राज्य सरकारकडून शेतकऱ्यांसाठी सौर ऊर्जेवर चालणाऱ्या फवारणी पंपांसाठी अनुदान योजना जाहीर करण्यात आली आहे. आता ही अर्ज प्रक्रिया मोबाईलवरून अगदी सहजपणे करता येईल. महाडीबीटी (MahaDBT) पोर्टलवर यासाठी अर्ज सादर करावा लागतो.

सौरचलित फवारणी पंपाचे फायदे

औषध फवारणीसाठी डिझेल/पेट्रोलचा खर्च वाचतो.

पर्यावरणपूरक आणि दीर्घकाळ टिकणारा पर्याय.

सौरऊर्जेमुळे वीज नसतानाही फवारणी शक्य.

येथे अर्ज करण्यासाठी वेबसाइट पहा

मोबाईलवरून ऑनलाईन अर्ज कसा कराल?

मोबाईलमधील Google Chrome ब्राउजर उघडा.

शोधा – “mahadbt farmer login”

“Agri Login” लिंकवर क्लिक करा.

खाली स्क्रोल करून सूचना वाचा आणि OK वर क्लिक करा.

तुमचा Farmer ID (शेतकरी ओळख क्रमांक) टाका.

जर Farmer ID माहित नसेल, तर “शेतकरी आयडी जाणून घ्या” लिंकवर क्लिक करा.

आधार नंबर टाका, OTP मिळवा.

OTP टाका → तपासा → तुमचा ID दिसेल.

OTP पाठवा → OTP टाका → “OTP तपासा” वर क्लिक करा.

अर्ज करण्याची प्रक्रिया

लॉगिन झाल्यावर “घटकासाठी अर्ज करा” या बटनावर क्लिक करा.

कृषी यांत्रिकीकरण → “बाबी निवडा”

“मुख्य घटक” → कृषी यंत्रसामग्रीसाठी अर्थसहाय्य निवडा.

“तपशील” → मनुष्यचलित औजारे

“यंत्रसामग्री” → पिक संरक्षण औजारे

“मशिन प्रकार” → सौरचलित नॅपसॅक फवारणी पंप निवडा.

बॉक्समध्ये टिक करा → जतन करा

अर्ज पूर्ण झाला की → अर्ज सादर करा वर क्लिक करा.

“Pay Application Fees” या बटनावर क्लिक करा.

अर्ज फी आणि पेमेंट प्रक्रिया

अर्ज फी: ₹23.60

“Make Payment” वर क्लिक करा.

QR कोड वापरून पेमेंट करा (सोपे आणि जलद).

पेमेंट झाल्यानंतर पावती PDF म्हणून सेव्ह करा किंवा प्रिंट घ्या.

अर्जाची पावती कशी पाहाल?

“घटक इतिहास पहा” या पर्यायावर क्लिक करा.

“लागू केलेले घटक” → “पावती पहा” वर क्लिक करा.

अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

पावती मोबाईलमध्ये PDF म्हणून सेव्ह करा किंवा प्रिंट घ्या.

IMG 20250624 065122

Leave a Comment