Snake Viral video: सोशल मीडियावर नेहमीच वेगवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ कधी मनोरंजक असतात. तर कधी हृदयाचे ठोके चुकवणारे असतात. सध्या असाच एक व्हिडीओ समोर आला आहे. जो पाहून तुम्हाला धक्का बसेल. हा व्हिडीओ अजगराचा आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे की अजगर ही जात सगळ्यात धोकादायक आहे.साप, अजगर हे शब्द जरी उच्चारले तरी अंगावर काटा येतो.
मानवी वस्तीत अनेकदा साप किंवा अजगर आढळून येतात. सोशल मीडियावर याचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर काटा येतो. अजगर किती खतरनाक प्राणी आहे हे आपल्या सर्वांना माहिती आहे. अजगरच्या जबड्यात जर एखादा प्राणी अडकला तर त्याचं वाचणं जवळपास अशक्य होऊन जातं. मात्र
दरम्यान सोशल मीडियावर एक भयानक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका भल्यामोठ्या अजरगराने व्यक्तीवर हल्ला चढवलयाचे दिसून आले. व्यक्ती पाण्यात डुबकी मारायला म्हणून जातो खरा पण पाण्याच्या वर येताच त्याच्या मानेला अजगराने वेढून धरल्याचे दिसून येते. अजगराला पाहताच संपूर्ण वातावरण बदलते आणि पुढे काय घडते ते तुम्हीच पाहा.
या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, यात आपल्याला दिसते की, तरुण पाण्याची मजा लुटण्यासाठी पाण्यात उडी मारतो. पण पुढे जे घडते ते त्याच्या कल्पनेपलिकडचे ठरते. व्हिडिओमध्ये दिसते की, पाण्यात उडी मारुन जेव्हा व्यक्ती पाण्याच्या वर येतो तेव्हा त्याच्या मानेवर एक भलामोठा अजगर बसलेला असतो. अजगर शिकार करण्याच्या तयारीत असून तरुणाच्या गळ्याला वेढण्याचा तो प्रयत्न करत असतो.
तरुणाला जेव्हा याची कल्पना येते तेव्हा तो लगेच पाण्यातच उभा राहून अजगराला आपल्या मानेवरुन दूर करण्याचा प्रयत्न करतो. हे दृष्य सर्वांनाच घाबरवून सोडते खरे पण यात व्यक्तीची नक्की सुटका होते की नाही ही बाब मात्र गुलदस्त्यातच राहते.
पाहा व्हिडीओ