तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत ते तपासा – दुसरे कोणी तुमचा नंबर वापरत तर नाही ना? Sim card check online

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत ते तपासा – दुसरे कोणी तुमचा नंबर वापरत तर नाही ना? Sim card check online

आजच्या घडीला मोबाईलशिवाय आपलं जीवन कल्पनाही करता येत नाही. अनेक लोक दोन-दोन मोबाईल वापरतात, तसेच ड्युअल सिम मोबाईलची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे.

पण याचाच गैरफायदा घेऊन काही ठिकाणी बनावट आयडी वापरून सिम कार्ड घेतले जातात आणि त्याचा वापर गुन्हेगारी कृत्यांसाठी केला जातो. अनेकदा एखाद्याच्या नावावर असलेला सिम नंबर दुसरी व्यक्ती वापरत असल्याचेही समोर आले आहे

तुमच्या नावावर किती सिम आहेत ते पहा.

हे तपासणे का गरजेचे आहे?

तुमच्या आयडीवर एखादा सिम नंबर नोंदणीकृत असेल आणि तुम्ही तो वापरत नसाल, तर त्याचे गंभीर परिणाम तुमच्यावर होऊ शकतात.

उदा. त्या नंबरवरून गैरकृत्य झाले तर पोलिस तपास तुमच्यावर येऊ शकतो. म्हणूनच, तुमच्या नावावर नक्की किती सिम कार्ड आहेत हे तपासणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

तुमचा नको असलेला सिम कार्ड नंबर बंद करण्यासाठी येथे क्लिक करा.

आजकाल दुसऱ्याच्या ओळखपत्रावर सिम कार्ड घेऊन फसवणूक करण्याच्या घटना वाढत आहेत. अशा फसवणुकीपासून वाचण्यासाठी वेळोवेळी तपासणे आवश्यक आहे की, तुमच्या नावावर किती नंबर चालू आहेत आणि त्यापैकी तुम्ही किती वापरत आहात.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

सरकारने उपलब्ध करून दिलेला उपाय

मोबाईल सिम कार्डशी संबंधित फसवणूक रोखण्यासाठी भारत सरकारच्या दूरसंचार विभागाने (DoT) खास पोर्टल सुरु केले आहे.

या पोर्टलद्वारे तुम्ही सहज पाहू शकता –

✔ तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत.

✔ कुठला नंबर दुसरी व्यक्ती वापरत आहे का.

✔ न वापरलेले सिम कार्ड ब्लॉक करण्याची सुविधा.

👉 यासाठी तुम्हाला फक्त या लिंकवर क्लिक करावे लागेल : www.sancharsaathi.gov.in

महत्वाची माहिती

एका व्यक्तीच्या नावावर जास्तीत जास्त ९ सिम कार्ड नोंदणीकृत होऊ शकतात.

जर तुमच्या नावावर ९ पेक्षा जास्त नंबर सापडले, तर ताबडतोब न वापरणारे नंबर ब्लॉक करण्याची विनंती करू शकता.

या पोर्टलमुळे नागरिकांना त्यांच्या नावावर सुरु असलेले सर्व मोबाइल कनेक्शन पाहता येतात.

सावध रहा, सुरक्षित राहा

तंत्रज्ञान जितके आपले जीवन सोपे करते, तितकाच त्याचा गैरवापर धोकादायक ठरू शकतो. म्हणूनच मोबाईल आणि सिम कार्ड वापरताना जागरुक राहणे अत्यंत गरजेचे आहे.

तुमच्या नावावर किती सिम कार्ड आहेत हे वेळोवेळी तपासा आणि सुरक्षित रहा.

व्हाट्सअप फेसबुक इंस्टाग्राम व इतर सोशल मीडिया हॅक झाल्यास खाली दिलेले स्कॅनर डाऊनलोड करून स्कॅन करून फ्रॉड टाळू शकता.

डाऊनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या स्कॅनर वर टच करून डाऊनलोड करा

IMG 20250814 150858 scaled

Leave a Comment