गोविंदा, निलेश राणे, शहाजीबापू ते अक्षय महाराज, शिंदेंच्या शिवसेनेची 40 स्टार प्रचारक यादी जाहीर Shivsena Star Pracharak List

Shivsena Star Pracharak List:राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीसाठी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार संजय मोरे यांनी स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली आहे.

लाडकी बहीण योजना e-KYC लाभार्थी यादी जाहीर! नाव कसे तपासावे येथे पहा Ladki Bahin Yojana E-KYC List

आगामी महानगरपालिका निवडणूक 2025-26 च्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाचे “स्टार प्रचारक” म्हणून 40 जणांची यादी जाहीर करण्यात आली आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान असलेल्या आमदार भावना गवळी यांना महापालिका स्टार प्रचारकांच्या यादीतून वगळण्यात आलं आहे.

मोठी बातमी थर्टी फर्स्ट’ पर्यंत ‘एचएसआरपी’ बसवा; अन्यथा 10,000 रुपये रुपये दंड भरण्यास सुरुवात करा HSRP Number Plate Last Date

शिवेसना स्टार प्रचारकांची यादी

एकनाथ शिंदे ,मुख्य नेते व उप-मुख्यमंत्री

रामदास कदम, नेते

गजानन कीतीकर, नेते

आनंदराव अडसूळ, नेते

डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे, खासदार आणि शिवसेना संसदीय गट नेते

प्रतापराव जाधव, केंद्रीय मंत्री

डॉ.निलमताई गोन्हे, नेत्या

मिनाताई कांबळी, नेत्या

गुलाबराव पाटील, नेते व मंत्री

दादाजी भुसे, उपनेते व मंत्री

उदय सामंत, उपनेते व मंत्री

शंभूराज देसाई, उपनेते व मंत्री

संजय राठोड, मंत्री

संजय शिरसाट, प्रवक्ते व मंत्री

भरतशेठ गोगावले, उपनेते व मंत्री

प्रकाश आबिटकर, मंत्री

प्रताप सरनाईक, मंत्री

आशिष जयस्वाल, राज्यमंत्री

योगेश कदम, राज्यमंत्री

दिपक केसरकर, प्रवक्ते व आमदार

श्रीरंग बारणे, उपनेते व खासदार

धैर्यशील माने, खासदार

संदीपान भुमरे, खासदार

नरेश म्हस्के, खासदार

रवींद्र वायकर, खासदार

मिलिंद देवरा, खासदार

दिपक सावंत, उपनेते व माजी मंत्री

शहाजी बापू पाटील, उपनेते व माजी आमदार

राहुल शेवाळे, उपनेते व माजी खासदार

मनिषा कायंदे, सचिव व आमदार

निलेश राणे, आमदार

संजय निरुपम, प्रवक्ते

राजू वाघमारे, प्रवक्ते

ज्योती वाघमारे, प्रवक्ते

पूर्वेश सरनाईक, युवासेना कार्यध्यक्ष

राहुल लोंढे, युवसेना सचिव

अक्षयमहाराज भोसले, शिवसेना प्रवक्ते व अध्यक्ष, शिवसेना धर्मवीर आध्यात्मिक सेना

समिर काझी, कार्याध्यक्ष, अल्पसंख्याक विभाग

शायना एन.सी., राष्ट्रीय प्रवक्त्या

गोविंदा अहुजा, माजी खासदार

शिवसेनेनं टायमिंग साधलं

एकीकडं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी युती जाहीर झाल्याचं आज जाहीर केलं आहे. नेमक्या याच दिवशी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेनं स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे.

Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: पहिले बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर अभिवादन,. ठाकरे बंधूंच्या युतीची आज घोषणा! जागा वाटप जाहीर

एकनाथ शिंदे यांनी लोकशाहीत युती आघाडी होत असतात. काही जणांची युती जनतेसाठी होते, जशी आमची महायुती आहे. आता झालेल्या युती सत्तेसाठी, खुर्चीसाठी, स्वार्थासाठी असल्याचं एकनाथ शिंदे यांनी म्हणत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यावर टीका केली.

Leave a Comment