शिक्षण विभागात लिपिक, ग्रंथपाल, सहायकच्या १७,५०० पदांची भरती! – School Non Teaching Staff Recruitment

School Non Teaching Staff Recruitment:मित्रांनो, एक मोठी बातमी समोर येत आहे. नवीन माहिती नुसार महाराष्ट्र राज्य सरकारने मेगाभरतीची घोषणा केली आहे. यामध्ये विविध शासकीय विभागातील पदांची भरती होणार आहे. राज्यातील शिक्षक भरतीचा मार्गही मोकळा झाल्याने शिक्षण विभागातील १७,५०० पदांसाठी जाहिरात येणार असल्याची माहिती आहे.

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीचा मुहूर्त मिळाला असून त्यांच्या भरतीचा मार्ग मोकळा झाल्याने राज्यातील खासगी अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील प्रशासकीय कामकाजास दिलासा मिळाल्यामुळे आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. शाळांमध्ये २००५ नंतर शिक्षकेतर पदांची भरती झालेली नाही. पूर्वी या पदांबाबत माजी शिक्षण संचालक चिपळूणकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली.

राज्यभरात १ लाख १५ हजार विविध पदे भरली जाणार लिपिक, ग्रंथपाल तसेच प्रयोगशाळा सहायक अशी विविध पदे भरली जाणार आहेत. त्यानुसार कनिष्ठ लिपिक १७ हजार ६९५ पदे, वरिष्ठ लिपिक चार हजार ९१२ पदे, मुख्य लिपिकांची ९२३ पदे, ग्रंथपालांची दोन हजार ११८ पदे भरली जाण्याची शक्यता आहे. तसेच नववी ते दहावी स्तरासाठी चार हजार ६८५ व उच्च माध्यमिक स्तरासाठी दोन हजार ४० प्रयोगशाळा सहायक पदे निर्माण केली जाणार आहेत

पदांचा आकृतिबंध निश्चित करण्यात आला. पुन्हा नव्याने आढावा घेण्याच्या निमित्ताने ही पदे प्रसिद्ध केले असून लिपिक, ग्रंथपाल, प्रयोगशाळा सहायक पदासाठीची शैक्षणिक पात्रता निश्चित केली आहे. कनिष्ठ लिपिक नाहीत.

शासनाने नुकतेच राजपत्र पदासाठी शासनमान्य विद्यापीठाची शिक्षकेतर पदांची भरती, शिक्षकेतर आजपर्यंत भरली गेली शाळांना मिळणार कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक असणार आहे; तर वरिष्ठ व मुख्य लिपिक पदे पदोन्नतीच्या आधारे भरली जाणार आहेत. त्यासाठी किमान तीन वर्षांची सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक असणार आहे. या निर्णयामुळे शाळा प्रशासनाला नवे बळ मिळणार आहे.

चतुर्थ श्रेणी शिपाई सेवकपद रद्द केल्याने शाळांसमोर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे मुला-मुलींच्या सुरक्षेच्या अनुषंगाने काम करणारा काका, मामा, मावशी म्हणणारा घटक शाळेत भविष्यात राहिला नाही तर ही धोक्याची घंटा ठरणार आहे.

आता ही भरती पुन्हा एकदा ट्रॅकवर येणार असल्याने, शाळांमधील व्यवस्थापनाला मोठा आधार मिळणार आहे. त्याचबरोबर सध्या शिक्षकांवर टाकण्यात येणाऱ्या शिक्षकेतर जबाबदाऱ्या देखील कमी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काय मंजूर झालंय?

राज्य सरकारने खासगी अनुदानित शाळांसाठी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या भरतीसंदर्भात सुधारित आकृतीबंध (Revised Staffing Pattern) लागू केला आहे. यामध्ये खालील पदांचा समावेश आहे:

कनिष्ठ लिपिक

वरिष्ठ लिपिक

मुख्य लिपिक

पूर्णवेळ ग्रंथपाल

प्रयोगशाळा सहाय्यक

या सर्व पदांवर “१०० टक्के नामनिर्देश” (Nomination-Based Recruitment) पद्धतीने भरती केली जाणार आहे. अनुपात तत्त्वानुसार ही पदं वितरित करण्यात येणार असल्यामुळे योग्य संस्थांना त्यांचा हिस्सा मिळेल आणि पारदर्शकतेला चालना मिळेल.

Leave a Comment

Close Visit agrinews24tas