मोठी बातमी या जिल्ह्यातील शाळांना अचानक सुट्टी जाहीर School Holiday Announcement

School Holiday Announcement:ज्याअर्थी, अहिल्यानगर व धाराशिव जिल्हयात जास्त प्रमाणात झालेल्या पावसामुळे सिना कोळेगांव, चांदणी, खासापूरी प्रकल्पातून अतिरिक्त जलसाठा तसेच भोगावती नदीमधून सिना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे. सदर परिस्थितीत सिना नदीकाठावरील तसेच लगतच्या गावांमध्ये पूर सदृश्य परिस्थिती निर्माण होऊन पूराचा धोका उदभवण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

ज्याअर्थी, भारतीय हवामान खात्याकडून दिनांक २२/०९/२०२५ रोजी सोलापूर जिल्हयाला अतिवृष्टीचा (Heavy to very heavy rainfall at a few places with extremely heavy rainfall at isolated places) रेड अलर्टचा इशारा देण्यात आलेला आहे.

हिंमतच कशी होते? ठाण्यात दुकानात काम करणाऱ्या मुलीला मालकानं पाठवले अश्लील मेसेज; तरुणीनं कसा धडा शिकवला पाहाच… Thane Viral video

सोलापूर जिल्हयामध्ये (ग्रामीण) आज दिवसभर सर्वच भागात पाऊस झाल्यामुळे व सिना नदीस आलेल्या पूर सदृश्य परिस्थितीमुळे सोलापूर जिल्हयातील उत्तर सोलापूर (ग्रामीण), माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी, आणि अपर तहसिल कार्यालय, मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व माध्यमाच्या शाळा व महाविद्यालय यांना दिनांक २३/०९/२०२५ रोजी सुट्टी जाहिर करणे आवश्यक असल्याचे माझे मत झाले आहे.

आणि ज्याअर्थी, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ मधील कलम २५ अन्वये, जिल्हाधिकारी हे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष आहे.

ज्याअर्थी, महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील क्रमांकः संकीर्ण-२०१९/प्र.क्र.१९९/एस.डी.२. दिनांक ०२ ऑगस्ट, २०१९ रोजीच्या परिपत्रकान्वये, आपत्तीच्या पूर्वसुचनेवरून, हवामान खात्याच्या अंदाजावरुन तसेच त्या-त्या भागातील स्थानिक परिस्थितीचा आढवा घेऊन, संपूर्ण जिल्हयाकरिता अथवा जिल्हयातील ठराविक क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर करण्याचे अधिकार संबंधित जिल्हयांच्या जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेले आहे.

त्याअर्थी, मी कुमार आशिर्वाद, जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर मला आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व महाराष्ट्र शासन, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, मंत्रालय मुंबई यांचेकडील परिपत्रक दिनांक ०२ ऑगस्ट, २०१९ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारान्वये सौलापूर जिल्हयातील उत्तर सोलापूर (ग्रामीण), माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी, आणि अपर तहसिल कार्यालय, मंद्रुप, ता. दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी शाळा व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनादानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था यांना दिनांक २३/०९/२०२५ रोजी सुट्टी जाहिर करीत आहे.

Maharashtra New Districts: राज्यात होणार २० नवीन जिल्हे अन् ८१ तालुके ; सरकारचा नेमका प्लॅन काय?

तथापि, उक्त कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत उपस्थित राहुन

स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज करावे. उक्त आदेशाची अंमलबजावणी तात्काळ करण्यात यावी.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment