School Holiday Announcement:महाराष्ट्रातील शाळेसंदर्भात महत्त्वाची बातमी आहे. प्रत्येक पालक आणि विद्यार्थ्यांनी शाळेला सुट्टीसंदर्भातील तारखी नोंद करुन घ्यावी. राज्यातील शाळेला सणांची सुट्ट्या या स्थानिक पातळीवर तिथले प्रशासन घेत आहेत. श्रावण महिना सुरु झाल्यापासून सणाला सुरुवात होते.
या सणांसाठी सुट्टीसंदर्भात राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुक्यात शाळा प्रशासन निर्णय घेत असतात. 22 ऑगस्ट 2025 ला श्रावण अमावस्या म्हणजे पिठोरी अमावस्या आहे. महाराष्ट्रात पिठोरी अमावस्येला बैल पोळा साजरा करण्यात येतो.
बैलांप्रती आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बैल पोळा शेतकरी साजरा करतात. यादिवशी बैलांना सजवून त्यांची पूजा केली जाते. त्यांना पुरणाचे नैवेद्य दाखवला जातो.
शेतकरी बांधवासाठी बैल पोळाचा सण खूप महत्त्वाचा आणि मोठा मानला जातो. अशा या बैल पोळा सणाचे राज्यातील शाळांना सुट्टी आहे की, नाही याबद्दल जाणून घ्या.
22 आणि 23 ऑगस्टला शाळेला सुट्टी?
22 ऑगस्ट 2025 ला बैल पोळा सण महाराष्ट्रातील विदर्भात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यासोबत मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात हा सण साजरा करण्यात येतो. जसं आम्ही म्हणालो, सणांची सुट्टी ही प्रत्येक शहर, ग्रामीण भागात तिथले स्थानिक प्रशासन घेतात.
त्यानुसार 22 ऑगस्टला अकोल्यात पोळा निमित्त ग्रामीण भागात शाळांना सुट्टी देण्यात आली आहे तर शहरी भागात काही शाळांनी अर्धा दिवस सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
गोंदिया, भंडारा, तुमसर याठिकाणी 22 ऑगस्टला बैल पोळ्याची सुट्टी देण्यात आली आहे. तर नागपूर शहर आणि संभाजी नगर जिल्ह्यात बैल पोळ्याची सुट्टी नाही. पुणे आणि मुंबईतील शाळांनाही बैल पोळ्याची सुट्टी नाही.
तर विदर्भात 23 ऑगस्ट 2025 ला तान्हा पोळादेखील साजरा करण्यात येतो. तान्हा पोळा हा लहान मुलांसाठी असतो. बैल पोळ्याचा दुसऱ्या दिवशी तान्हा पोळाचा उत्साह असतो. या दिवशी लहान मुले आपआपल्या लाकडी बैलाला सजवतात.
शहरातील मैदानात किंवा मंदिरात तान्हा पोळा भरवला जातो. त्यामुळे या सणाचा उत्साह मुलांमध्ये दिसून येतो. त्यामुळे विदर्भात 23 ऑगस्ट 2025 ला तान्हा पोळ्याची शाळांना देण्यात आली आहे.
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा