सरळसेवा भरती 2025 | नवीन GR प्रसिद्ध । आरोग्य, जिल्हा परिषद, तलाठी, गट ड Saralseva Recruitment 2025

Saralseva Recruitment 2025:भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित), गट-क व गट-ड संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने महापरीक्षा पोर्टल मार्फत भरण्याबाबतची संदर्भाकित दिनांक ४ मे, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात आल्या आहेत.

१९ मिनिटांचा MMS व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तरुणीची आत्महत्या? समोर आला आणखी एक धक्कादायक VIDEO.19 Minutes Viral MMS

उक्त शासन निर्णयातील परि.क्र.११ नुसार शासनाच्या विविध विभागांमध्ये परीक्षेद्वारे होणाऱ्या भरती प्रक्रियेत तयार करण्यात आलेल्या निवडसूचीची कालमर्यादा १ वर्षासाठी किंवा निवडसूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंची रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत त्या दिनांकापर्यंत यापैकी नंतर घडेल तोपर्यंत ग्राहय असल्याचे नमूद केले आहे.

परंतु, अनेक वेळा प्रशासकीय कारणास्तव, न्यायालयीन प्रक्रिया, निवडणूका व आचारसंहिता, कोविडसारख्या आपत्तीजन्य परिस्थिती, माजी सैनिक, खेळाडू, दिव्यांग उमेदवारांच्या विविध सेवाविषयक अटी व शर्ती विचारात घेणे, वैद्यकीय तपासणी प्रक्रिया तसेच नवीन पदभरती प्रक्रियेतील विलंब या कारणांमुळे प्रतिक्षा यादीतील पात्र उमेदवारांना संधी मिळण्यापूर्वीच निवडसूचीची मुदत संपुष्टात येते.

“म्हणून कुणालाच कमी समजू नका” जॅग्वारनं अवघ्या २५ सेकंदात भल्यामोठ्या अजगराला फाडून टाकलं, VIDEO पाहून व्हाल हैराण Viral video

यामुळे पात्र व गुणवत्ताधारक उमेदवारांचे नुकसान होत असून शासनालाही इतकी प्रक्रिया पार पाडल्यानंतरही पात्र उमेदवारांच्या सेवांचा लाभ घेता येत नाही. त्यामुळे अनेक पदे रिक्त राहून त्यासाठी पुनश्च सर्व निवडप्रक्रिया पार पाडावी लागते, या सर्व वस्तुस्थितीचा विचार करता निवडसूचीची कालमर्यादा वाढविण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

दिनांक ४ मे, २०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळांच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) गट-ब (अराजपत्रित) गट-क व गट-ड संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील पदे सरळसेवेने भरण्याबाबतच्या एकत्रित मार्गदर्शक सूचनांमधील परि.क्र.११ “निवडसूचीची कालमर्यादा” अंतर्गत (अ) मध्ये या शासन निर्णयान्वये खालीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे:-

महावितरणकडून कृषिपंपांसाठी नवीन धोरण; शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज. Farmer Day Light New Rule

“निवड समितीने तयार केलेली निवडसूची २ वर्षांसाठी किंवा नवीन सूची तयार करण्यासाठी सेवाभरतीची जाहिरात देण्यात येईल, त्या दिनांकापर्यंत यापैकी जो दिनांक आधी घडेल, त्या दिनांकापर्यंत विधीग्राह्य ठरेल. तसेच ही मुदतवाढ निवडसूची तयार करताना ज्या दिनांकापर्यंतची रिक्त पदे विचारात घेण्यात आली आहेत, त्या पदांपुरतीच असेल.”

२. दिनांक ४ मे, २०२२ रोजीच्या शासन निर्णयातील इतर मार्गदर्शक सूचना कायम राहतील.

३. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून, त्याचा संकेतांक २०२५१२०२१६३८५८७२०७ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

1002331415

Leave a Comment