Revised In-Service Assured Progress Scheme:10 , 20 व 30 वर्षे तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागु करण्याचे वित्त विभाग मार्फत निर्देश देणेबाबत राज्य सरकारच्या वित्त विभाग मार्फत दिनांक 03.07.2025 रोजी परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहेत.
सरकारी कर्मचाऱ्यांना सेवेच्या 10 , 20 व 30 वर्षे सेवा पुर्ण झाल्याच्या नंतर पदोन्नतीची / पे-स्केल मधील पुढील वेतनश्रेणी लागु करण्यात येते . यालाच आश्वासित प्रगती योजना असे म्हणतात.
वित्त विभागाच्या दिनांक 03.07.2025 रोजीच्या शासन परिपत्रकानुसार राज्याच्या उप-सचिव शालेय शिक्षण व क्रिडा विभाग यांच्या प्रति परिपत्रक सादर करण्यात आलेला आहे . सदर पत्राचा विषय हा राज्यातील शिक्षकांना तीन लाभांची सुधारित सेवांतर्गत आश्वासित प्रगती ( 10 ,20 व 30 वर्षे ) योजना लागु करणेबाबत असा आहे .
यांमध्ये नमुद करण्यात आले आहेत कि , राज्य सल्लागार / राज्य कोषाध्यक्ष / राज्य कार्याध्यक्ष / राज्यसचिव / राज्याध्यक्ष , महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना यांचे दिनांक 10 जुन 2025 रोजीचे पत्र जोडण्यात येत आहेत.
सदर पत्रातील विषय हा शालेय शिक्षण व क्रिडा विभागाशी संबंधित असल्याने , सदर मुळ पत्र नियमानुसार उचित कार्यवाहीसाठी पाठविण्यात आलेला आहे . तरी नियमानुसार उचित कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.