RBI Assistant Recruitment : आरबीआयमध्ये असिस्टंट पदाच्या 650 जागांसाठी भरती, 58514 रुपये पगार मिळणार, जाणून घ्या सविस्तर माहिती

RBI Assistant Recruitment : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियात सहायक पदाच्या 650 जागांसाठी भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून सहायक पदाच्या 650 जागंसाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. पात्र उमेदवारांनी सहायक पदासाठी ऑनलाईन पद्धतीनं आरबीआयच्या वेबसाईटला भेट देऊन अर्ज दाखल करावा, असं आवाहन करण्यात आलं आहे. आरबीआयकडून सहायक पदासाठी दोन टप्प्यात परीक्षा घेतलीजाईल. यामध्ये पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि स्थानिक भाषा प्राविण्यता चाचणी उमेदवारांना द्यावी लागेल.

सहायक पदासाठी पात्रता

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सहायक पदाच्या 650 जागांसाठी अर्ज दाखल करणारे उमेदवार भारतीय नागरीक असावेत. याशिवाय उमेदवारानं भारतातील मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी 50 टक्के गुणांसह उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग उमेदवारांसाठी ही अट शिथील आहे. याशिवाय उमेदवारांना संगणकाची हाताळणी करता येणं आवश्यक आहे.

आरबीआयच्या सहायक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचं वय 20 ते 28 वयोमर्यादेदरम्यान असावं. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 5 वर्षांपर्यंत शिथील असेल. तर, ओबीसी उमेदवार 31 वर्षांपर्यंत अर्ज दाखल करु शकतात

महत्त्वाच्या तारखा

आरबीआयच्या सहायक पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी 16 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान अर्ज दाखल करावेत. परीक्षा शुल्क ऑनलाईन पद्धतीनं जमा करायचं आहे. सहायक पदासाठी पूर्व परीक्षा 11 एप्रिल रोजी होणार आहे. तर, मुख्य परीक्षा 7 जूनला होईल. परीक्षेच्या तारखांमध्ये बदल करण्यासंदर्भातील अधिकार आरबीआयनं त्यांच्याकडे राखून ठेवले आहेत.विशेष बाब म्हणजे परीक्षा कालावधीमध्ये मोबाईल आणि इतर इलेक्ट्रिक उपकरणांचा वापर करण्यास मनाई करण्यात आली आहे.

परीक्षेचं स्वरुप :

सहायक पदाची भरती प्रक्रिया तीन टप्प्यात पार पडणार आहे. पहिल्या टप्प्यात 100 गुणांची पूर्व परीक्षा होईल. त्यानंतर 200 गुणांची मुख्य परीक्षा उमेदवारांना द्यावी लागेल. शेवटी भाषा प्राविण्यता चाचणी द्यावी लागेल.

पूर्व परीक्षेत इंग्रजी भाषा, गणितीय क्षमता आणि तार्किक क्षमता यावर प्रश्न असतील. तर, मुख्य परीक्षेत तार्किक क्षमता, इंग्रजी भाषा, गणिती क्षमता, सामान्य ज्ञान आणि संगणक ज्ञान यावर एकूण 200 प्रश्न विचारले जातील.

आरबीआयच्या सहायक पदाच्या एकूण 650 जागांपौकी 110 जागा अनुसूचित जाती,37 जागा अनुसूचित जमाती, 99 जागा ओबीसी प्रवर्ग, 58 जागा ईडब्ल्यूएस आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 346 जागा राखीव आहेत. 650 पैकी मुंबई कार्यालयात 249 जागा आणि नागपूर कार्यालयात 17 जागा भरल्या जाणार आहेत. मुंबईतील कार्यालयात 54 जागा अनुसूचित जाती प्रवर्ग, 2 जागा अनुसूचित जमाती, ओबीसींसाठी 25, ईडब्ल्यूएससाठी 24 आणि सर्वसाधारण प्रवर्गासाठी 144 जागा राखीव असतील.

दरम्यान,सर्वसाधारण, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस प्रवर्गातील उमेदवारांना 450 रुपये परीक्षा शुल्क आणि 18 टक्के जीएसटी रक्कम भरावी लागेल. तर, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि माजी सैनिक, दिव्यांग उमेदवारांना 50 रुपये शुल्क आणि 18 टक्के जीएसटी भरावा लागेल.

Leave a Comment