Rates Kill Desi Jugad:उंदीर हा सर्वांत त्रासदायक प्राणी आहे, जो केवळ धान्य, बूट, कपडेच कुरतडत नाही, तर शिजवलेले अन्नदेखील खराब करतो. त्यामुळे आजारांचा धोका वाढतो आणि स्वयंपाकघर सतत अस्वच्छ राहते.
उंदरांपासून मुक्त होण्यासाठी विविध औषधे वापरली जात असली तरी उंदीर काही दिवसांनी परत घरात शिरकाव करतात. अशा परिस्थितीत त्यांना हाकलवण्यासाठी परिणामकारक घरगुती उपाय शोधण्याची गरज भासते. आज आम्ही तुम्हाला अतिशय कमी किमतीत उंदरांना पळवून लावण्याचा जालीम उपाय सांगणार आहोत, ज्यासाठी तुम्हाला फक्त १० रुपये लागतील.
कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी आनंदाची बातमी; DA आणि DR मध्ये 2% वाढ! | Government Employees
उंदरांना पळवून लावण्यासाठी घरगुती उपाय
उंदीर पळवण्यासाठी कांद्याचा वापर करता येतो. असे म्हणतात की, उंदीर कांद्याच्या वासाने पळून जातात आणि परत येत नाहीत. म्हणून १० रुपयांचे कांदे खरेदी करा आणि ते वापरा. उंदरांच्या निर्मूलनासाठी कांदा दोन पद्धतींनी वापरता येतो. कसे ते जाणून घेऊया.
पहिली पद्धत : कांद्याचे तुकडे विखरून ठेवणे
या पद्धतीत तुम्हाला कांदा तुकडे करून वापरावा लागेल. तेव्हा तुम्ही कांदा सोलून त्याचे लहान लहान तुकडे करा. ते स्वयंपाकघरात वेगवेगळ्या ठिकाणी विखरून ठेवा.
आता लायसन्ससाठी जादा पैसे मोजावे लागणार… नवीन दर पहा Driving Licence New Charges
त्यामुळे कांद्याच्या उग्र वासाने उंदीर तिथून जवळपास न राहता, घरातून दूर पळ काढतील. परंतु, त्यासाठी तुम्हाला दर आठवड्याला वापरलेले कांद्याचे तुकडे फेकून देऊन, त्या जागी नवीन कांद्याचे तुकडे वापरावे लागतील
दुसरी पद्धत : कांद्याच्या रसा वापर
या पद्धतीत तुम्हाला कांद्याच्या रसाचा वापर करावा लागेल. कांद्याचा रस काढण्यासाठी, कांदा मिक्सर ग्राईंडरमध्ये ठेवा. त्यात तीन चमचे पाणी घाला आणि तो बारीक करा. नंतर तो रस एका भांड्यात गाळून घ्या आणि स्वयंपाकघरातील विविध ठिकाणी लावून ठेवा.
या गोष्टी लक्षात ठेवा
हा उपाय वापरताना, तुम्ही ताजे कांदे वापरावेत. जुने कांदे जास्त काळ टिकत नाहीत.
तुम्ही कांद्याच्या रसाचा स्प्रे बनवू शकता आणि त्यासाठी तुम्हाला स्प्रे बाटली वापरावी लागेल.
हे उपायही करून बघा
पेपरमिंट ऑइल वापरा
तुमच्या घरातच उंदरांना पळवून लावण्याचे अनेक प्रभावी आणि सुरक्षित उपाय तुम्हाला सापडू शकतील. त्यासाठी तुम्हाला आम्ही अशा काही गोष्टी वापरण्यास सांगत आहोत, ज्यांचा वास उंदरांना अजिबात आवडत नाही.
त्यापैकी सर्वात प्रभावी उपाय म्हणजे पेपरमिंट ऑइल. त्याचा वापर करून तुम्ही तुमचे घर स्वच्छ आणि उंदीरमुक्त करू शकता. पेपरमिंट ऑइलच्या वासाने आपल्याला ताजेतवाने झाल्यासारखे वाटू शकते; परंतु उंदरांना तो वास खूप असह्य होतो.
त्यासाठी घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पेपरमिंट ऑइलमध्ये मिसळलेला कापसाचा बोळा ठेवा. त्यामुळे उंदीर लगेच घर सोडून पळून जातील. तसेच पुन्हा त्यांचा वावर घरात दिसणार नाही. त्यामुळे पेपरमिंट ऑइल उंदरांना पळवून लावण्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.
पुदिना वापरा
पुदिन्याचा तीव्र वास उंदरांच्या श्वसनसंस्थेवर परिणाम करतो. त्यामुळे त्या वासापासून ते दूर पळण्याचा प्रयत्न करतात. उंदरांना घरापासून दूर ठेवण्यासाठी पुदिन्याची पाने घराच्या कानाकोपऱ्यात ठेवा.
त्यामुळे तुमच्या घरात उंदरांचा प्रवेश टाळता येईल. पुदिन्याचा वास खूप स्ट्राँग असतो, ज्याचा वास उंदरांना सहन न झाल्याने तिथून उंदीर नाहीसे होतात. उंदीर वारंवार येतात अशा ठिकाणी तुम्ही पुदिन्याची वाळलेली पाने किंवा पुदिन्याची रोपेदेखील ठेवू शकता.
सोने 3 हजार तर चांदी तब्बल 9 हजार रुपयाची मोठी घसरण! नवीन दर पहा.Gold Silver Rate Today