पुन्हा भीषण विमान अपघात ! रांची-दिल्ली ‘एअर अॅम्ब्युलन्स’ कोसळली; रुग्ण आणि डॉक्टरांसह 7 जणांचा मृत्यू.Ranchi Air Ambulance Plane Crash

Ranchi Air Ambulance Plane Crash:रांचीहून दिल्लीला जाणाऱ्या एका ‘मेडीकल चार्टर्ड’ विमानाला सोमवारी झारखंडमधील चतरा जिल्ह्यातील कसारिया भागात अपघात झाला आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या विमानात एका रुग्णासह एकूण सात जण प्रवास करत होते.

हे विमान दिल्लीतील रेडबर्ड एअरवेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मालकीचे बीचक्राफ्ट C90 aircraft VT-AJV हे होते. या विमानाने संध्याकाळी रात्री ७ वाजून ११ मिनिटांनी रांची येथून उड्डाण केले होते, अशी माहिती डीजीसीएने दिली आहे.

विमानात असलेल्या सात जणांमध्ये एका रुग्णासह एक डॉक्टर, एक पॅरामेडिक, दोन अटेंडंट, पायलट इन कमांड आणि एका को-पायलटचा समावेश होता. हे विमान रात्री १० वाजता दिल्लीत पोहचणे अपेक्षित होते.

विमानाचा ७ वाजून ३४ मिनिटांनी एअर ट्रॅफिक कंट्रोलशी संपर्क तुटला. विमान ज्या कोसळले तो चितरा जिल्हा रांचीपासून १३० किमी अंतरावर आहे.

विमान अपघात व्हिडिओ

पाहण्यासाठी येथे क्लिक

करा 

“जिल्हा प्रशासनाचे शोध आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले असून, एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (AAIB) चे पथकही रवाना करण्यात येत आहे,” अशी माहिती नागरी विमान वाहतूक संचालनालयाने (DGCA) दिली आहे.

पोलीस पथक घटनास्थळी पोहोचत असून, त्यानंतरच जीवितहानी आणि नुकसान याबद्दल माहिती समजेल, असे चतराचे पोलीस अधीक्षक यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना सांगितले.

विमानात कोण होते?

या विमानात वैमानिक विवेक विकास भगत आणि स्वराजदीप सिंग हे होते. तर या विमानातून ४१ वर्षीय पेशन्ट संजय कुमार यांना दिल्ली येथे नेण्यात येत होते.

याबरोबरच विमानात पॅरामेडिक सचिन कुमार मिश्रा, डॉक्टर विकास कुमार गुप्ता आणि अटेंडन्ट अर्चना देवी आणि धुरू कुमार हे देखील होते.

धक्कादायक व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment