शेतकऱ्यांसाठी सरकारची पेन्शन योजना; दरमहा मिळणार 3000 रुपये ! जाणून घ्या अर्ज कसा करायचा?Prime Minister Kisan Maandhan Yojana

Prime Minister Kisan Maandhan Yojana : केंद्र सरकार शेतकऱ्यांना पेन्शन देण्यासाठी प्रधानमंत्री किसान मानधन योजना (PM Kisan Maandhan Yojana) राबवत आहे. नोकरी करणारे लोक स्वतःचे निवृत्ती नियोजन नीट करतात, पण अनेक शेतकरी अजूनही या योजनेपासून अनभिज्ञ असतात.

वृद्धावस्थेत शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू नये म्हणून ही योजना सुरू करण्यात आली आहे. यात पात्र शेतकऱ्यांना वयाच्या ६० वर्षांनंतर दरमहा ₹3000 पेन्शन दिली जाते.

SSC, HSC Exam 2026: १०वी, १२वी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना! गुणपत्रिकेसाठी APAAR नोंदणी करणे अनिवार्य.SSC, HSC Students APAAR ID Registration

पीएम किसान मानधन योजना म्हणजे काय ?

केंद्र सरकारने ही योजना लहान, सीमांत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकऱ्यांसाठी सुरू केली आहे. या योजनेचा उद्देश अन्नदात्यांच्या (शेतकऱ्यांच्या) हातात वृद्धापकाळात नियमित उत्पन्नाचे साधन असावे, आणि त्यांनी चिंतामुक्त जीवन जगावे हा आहे. कारण अनेक शेतकऱ्यांकडे त्या वयात बचत उरत नाही.

अर्ज कसा करायचा?

या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) येथे जाऊन नोंदणी करावी.

नोंदणीनंतर शेतकऱ्यांना त्यांच्या वयानुसार दरमहा ₹55 ते ₹200 पर्यंतचा प्रीमियम भरावा लागतो.

जेव्हा शेतकरी 60 वर्षांचे होतील, तेव्हा केंद्र सरकार त्यांच्या खात्यात दरमहा पेन्शन जमा करेल.

एसटी महामंडळाची ‘आवडेल तिथे प्रवास’ योजना! राज्यात, परराज्यातील प्रवासासाठी कमी केले २०० ते ८०० रुपयांनी सवलतीच्या पासची रक्कम, जाणून घ्या दर…MSRTC Pass Scheme Price

योजनेची वैशिष्ट्ये

18 ते 40 वर्षे वयोगटातील शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक पेन्शन योजना.

अल्प व अतिअल्प भूधारक शेतकरी पात्र.

60 वर्षांनंतर दरमहा ₹3000 निश्चित पेन्शन.

शेतकऱ्याला वयोमानानुसार ₹55 ते ₹200 इतका मासिक हप्ता भरावा लागतो.

शेतकरी जितके भरतील तितकीच रक्कम केंद्र सरकारही पेन्शन फंडात जमा करते.

नोंदणीकृत शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यास, त्याच्या पत्नीला अर्धी पेन्शन (₹1500 प्रतिमाह) मिळते.

कोणते शेतकरी अपात्र ठरतील ?

राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, कर्मचारी राज्य विमा योजना, EPFO इ. सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभार्थी.

प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना किंवा प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजनेतील लाभार्थी.

उच्च आर्थिक स्थितीतील शेतकरी.

जमीन धारण करणारी संस्था.

संवैधानिक पदाधिकारी जसे खासदार, आमदार, महापौर, जिल्हा परिषद अध्यक्ष इ.

केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचारी किंवा निवृत्त अधिकारी.

आयकर भरलेले व्यक्ती.

नोंदणीकृत डॉक्टर, वकील, अभियंते इ.

Land Record Digital 7/12 Legal Validity : डिजीटल ७/१२ ला कायदेशीर मान्यता, तलाठ्याच्या सही-शिक्क्याची गरजही संपली; अवघ्या १५ रुपयांत डाऊनलोड करा

आवश्यक कागदपत्रे

1. शेतकऱ्याच्या नावावर असणारा सातबारा, आठ-अ उतारा.

2. बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आवश्यक.

3. मोबाइल क्रमांक.

4. आधारकार्डवरील जन्मतारीख.

वरील सर्व कागदपत्रे घेऊन CSC केंद्रात जाऊन तुम्ही ऑनलाइन भरू शकता.

पेन्शन कधी मिळेल?

शेतकऱ्यांनी जितक्या लवकर नोंदणी केली, तितका प्रीमियम कमी भरावा लागतो. इच्छा असल्यास, शेतकरी पीएम किसान सन्मान निधी योजनेमधून मिळणारी रक्कम वापरूनही शेतकरी या योजनेचा प्रीमियम भरू शकतात. शेतकरी 60 वर्षांचे झाल्यावर त्यांना दरमहा ₹3000 पर्यंत पेन्शन मिळू लागते.

महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment