पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना! दरमहा मिळतात ₹9,250, फक्त हे एक काम करा Post Office Monthly Income Scheme

Post Office Monthly Income Scheme (POMIS):तुम्हाला दरमहा पगाराशिवाय एक अतिरिक्त नियमित उत्पन्न हवे आहे का? जर तुम्ही सुरक्षित आणि निश्चित उत्पन्न देणाऱ्या योजनेचा विचार करत असाल, तर पोस्ट ऑफिसची ही योजना तुमच्यासाठी सर्वोत्तम ठरू शकते. कारण यामध्ये तुमचं गुंतवलेलं पैसे सुरक्षित राहतात आणि दरमहा एक ठराविक रक्कम मिळत राहते. 5 वर्षांनी तुमचं मूळ पैसेही परत मिळतात.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम म्हणजे काय?

ही एक सरकारी हमी असलेली योजना आहे. यामध्ये तुम्ही एकदाच ठराविक रक्कम गुंतवता आणि त्यावर दरमहा निश्चित व्याज मिळते. या योजनेत व्याजदर आधीच निश्चित असतो आणि गुंतवणूक सुरक्षित राहते.कर्ज कमी करणे

कोण उघडू शकतो हे खाते?

कोणताही 18 वर्षांवरील व्यक्ती हे खाते उघडू शकतो.

खाते वैयक्तिक किंवा संयुक्त (जॉइंट) पद्धतीने उघडता येते.

संयुक्त खात्यामध्ये जास्तीत जास्त 3 जण असू शकतात.

10 वर्षांवरील मुलांच्या नावानेही पालक खाते उघडू शकतात.

ब्याजदर आणि गुंतवणुकीची मर्यादा

सध्या योजनेवर 7.4% वार्षिक व्याजदर आहे.

सिंगल खात्यात कमाल ₹9 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते.

संयुक्त खात्यात कमाल ₹15 लाखांपर्यंत गुंतवणूक करता येते.

योजनेचा कालावधी 5 वर्षांचा असतो.

पहिल्या 1 वर्षात पैसे काढता येत नाहीत.

दरमहा किती उत्पन्न मिळेल?

जर तुम्ही सिंगल अकाउंटमध्ये ₹9 लाख गुंतवले, तर दरमहा सुमारे ₹5,500 मिळतील.

संयुक्त खात्यात ₹15 लाख गुंतवले, तर दरमहा सुमारे ₹9,250 मिळतील.

5 वर्षांनंतर तुमची पूर्ण गुंतवणूक परत मिळते. हवे असल्यास ती पुन्हा गुंतवता येते.

तुकडाबंदी कायद्याचा तुकडा अखेर पडला, 50 लाख नागरिकांना जमिनीची मालकी, कायद्यातील जाचक अटी शिथिल,असा होणार फायदा New Land Fragmentation Law 2025

या योजनेत गुंतवणूक का करावी?

निवृत्त व्यक्ती, जेष्ठ नागरिक किंवा ज्यांना पेंशन मिळत नाही त्यांच्यासाठी ही योजना अतिशय फायदेशीर आहे.

कारण यामध्ये कोणताही बाजाराचा धोका नाही आणि दरमहा नियमित उत्पन्न मिळते.

सरकारची हमी असल्यामुळे गुंतवणूक पूर्णपणे सुरक्षित असते.

जर तुम्हाला दरमहा एक ठराविक रक्कम घरबसल्या हवी असेल आणि तुमचे पैसे सुरक्षित असावेत, तर पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम हा उत्तम पर्याय आहे.

विशेषतः जेष्ठ नागरिक आणि आर्थिक स्थैर्य हवे असणाऱ्यांसाठी ही योजना अत्यंत उपयुक्त आहे.

बँक ऑफ बडोदामध्ये 2500 पदांची भरती! महाराष्ट्रासाठी 485 पदे | Bank Of Baroda Recruitment 2025

Leave a Comment