Post Office Investment Wife सोबत एकत्र उघडा Post Office मध्ये खातं, दर महिन्याला मिळेल ₹९.२५० चं फिक्स व्याज

Post Office Investment: पोस्ट ऑफिसमध्ये, तुम्ही आरडी, टीडी, एमआयएस, पीपीएफ आणि किसान विकास पत्र यांसारख्या विविध प्रकारची बचत खाती उघडू शकता. पोस्ट ऑफिसच्या लोकप्रिय योजनांपैकी एक असलेली ‘मासिक उत्पन्न योजना’ (MIS), सध्या ७.४% वार्षिक व्याजदर देत आहे.

या योजनेअंतर्गत, तुम्हाला केवळ एकदाच गुंतवणूक करणं आवश्यक असते; त्यानंतर तुम्हाला दरमहा हमी आणि निश्चित व्याजाची रक्कम मिळते. हे व्याज तुम्हाला खातं उघडल्याच्या तारखेपासून सुरू होऊन, पुढील पाच वर्षांच्या कालावधीसाठी दिलं जातं.

जर तुम्ही या योजनेअंतर्गत तुमच्या पत्नीसोबत किंवा कुटुंबातील इतर कोणत्याही सदस्यासोबत संयुक्त खातं उघडलं, तर तुम्हाला दरमहा जास्तीत जास्त ₹९,२५० पर्यंतचे निश्चित व्याज मिळू शकतं.

१००० रुपयांपासून उघडू शकता खातं

एमआयएसमध्ये तुम्ही किमान १००० रुपयांच्या गुंतवणुकीसह खातं उघडू शकता. या योजनेअंतर्गत तुम्ही सिंगल आणि संयुक्त जॉइंट अशा दोन्ही प्रकारचं खातं उघडू शकता. सिंगल खात्यात जास्तीत जास्त ९ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात, तर जॉईंट खात्यात कमाल १५ लाख रुपये जमा करण्याची सुविधा आहे. पोस्ट ऑफिसच्या एमआयएस योजनेअंतर्गत संयुक्त खात्यात तुम्ही जास्तीत जास्त ३ व्यक्तींची नावं नोंदवू शकता. जर तुम्ही या योजनेच्या संयुक्त खात्यात तुमच्या पत्नीसोबत १५ लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर केवळ व्याजाच्या माध्यमातून तुमची दरमहा बसल्या जागी चांगली कमाई सुरू होऊ शकते.

व्याजाची रक्कम थेट खात्यात जमा होते

MIS हे असं खातं आहे, ज्यात तुम्ही एकदा रक्कम जमा करता आणि दर महिन्याला व्याजाच्या स्वरूपात पेन्शनसारखी निश्चित रक्कम मिळत राहते. उदाहरणार्थ, जर एखाद्या पती-पत्नीच्या जोडप्यानं संयुक्त खात्याअंतर्गत ₹४ लाख जमा केले, तर ७.४% च्या व्याजदरानं त्यांना दर महिन्याला ₹२,४६७ मिळतील.

वास्तविक, ही रक्कम फक्त व्याज असते, तुमची मूळ रक्कम ५ वर्षांपर्यंत सुरक्षित राहते आणि मुदत पूर्ण झाल्यावर ती पूर्णपणे परत मिळते. संयुक्त खात्याचे फायदेही कमी नाहीत. एका संयुक्त खात्यात जास्तीत जास्त तीन लोक सहभागी होऊ शकतात आणि गुंतवणुकीची मर्यादा ₹१५ लाखांपर्यंत वाढते.

पत्नीसह करू शकता मोठी कमाईजर तुम्ही पत्नीसह, तर १५ लाख जमा केल्यास त्यांना दरमहा अंदाजे ₹९,२५० मिळतील, जे एक मजबूत अतिरिक्त उत्पन्न बनू शकते. याचप्रमाणे, जर तुम्ही ₹९ लाख जमा केले, तर तुमचे मासिक उत्पन्न ₹५,५५० पर्यंत पोहोचतं. खाते उघडण्यासाठी पोस्ट ऑफिसमध्ये बचत खातं असणं आवश्यक आहे. जर तुमच्याकडे बचत खाते नसेल, तर आधी ते उघडावं लागतं. यानंतर एक साधा फॉर्म भरून MIS खातं उघडलं जाऊ शकतं.

वास्तविक पोस्ट ऑफिस पूर्णपणे भारत सरकारच्या अंतर्गत येते, त्यामुळे यात गुंतवलेली तुमची रक्कम १००% सुरक्षित राहते. MIS सारखी स्कीम अशा लोकांसाठी योग्य आहे, ज्यांना कोणत्याही जोखीमेशिवाय निश्चित उत्पन्न हवं आहे. ही योजना लहान गुंतवणूकदार आणि मध्यमवर्गीय कुटुंबांना कोणत्याही तणावाशिवाय त्यांच्या दर महिन्याच्या खर्चाचं व्यवस्थापन करण्यात चांगली मदत करते.

मिळते सरकारची गॅरेंटी

त्यामुळे, जर तुम्ही तुमच्या जीवनसाथीसोबत मिळून सुरक्षित आणि स्थिर उत्पन्नाच्या शोधात असाल, तर पोस्ट ऑफिस MIS तुमच्यासाठी एक उत्कृष्ट पर्याय आहे. एकदा गुंतवणूक करा आणि ५ वर्षांपर्यंत दर महिन्याला निश्चित रकमेचा लाभ घेता येऊ शकतो. थेट बँक खात्यात, कोणत्याही जोखमीशिवाय आणि कोणत्याही अडचणीशिवाय याचा लाभ मिळतो.

(टीप : यामध्ये सामान्य माहिती देण्यात आलेली आहे. हा गुंतवणूकीचा सल्ला नाही. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करण्यापूर्वी या क्षेत्रातील जाणकार किंवा तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

Leave a Comment