पी एम किसान योजनेचा 22 वा हप्ता 13 तारखेला जमा होणार! त्यापूर्वी लाभार्थी यादी जाहीर, येथे डाऊनलोड करा.PM Kisan Yojana 22th Insttalment New List 2026

PM Kisan Yojana 22th Insttalment New List 2026: होळीचा सण साजरा झाल्यानंतर आता देशातील करोडो शेतकऱ्यांच्या नजरा एकाच गोष्टीकडे लागल्या आहेत. ती म्हणजे पीएम किसान सन्मान निधीचा २२ वा हप्ता (PM Kisan 22nd Installment). सणाच्या मुहूर्तावर पैसे येतील अशी अपेक्षा होती, पण आता प्रतीक्षा संपण्याची वेळ आली आहे. सरकारकडून पुढील काही दिवसांतच शेतकऱ्यांच्या खात्यात आनंदाची बातमी धडकण्याची शक्यता आहे.

१३ मार्चला होणार मोठा धमाका?

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी १३ मार्च रोजी कोक्राझार (Kokrajhar) दौऱ्यावर असणार आहेत. याच कार्यक्रमातून पंतप्रधान देशातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात २२ व्या हप्त्याचे पैसे एका क्लिकवर जमा करण्याची दाट शक्यता आहे. जर या दिवशी घोषणा झाली, तर पुढील आठवड्याच्या अखेरीस शेतकऱ्यांच्या खात्यात २,००० रुपये जमा होतील.

लाभार्थी यादी पाहण्यासाठी येथे क्लिक करा

बळीराजाला वर्षाला मिळतात ६,००० रुपये

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत सरकार दरवर्षी शेतकऱ्यांना ६,००० रुपयांची आर्थिक मदत करते.

ही रक्कम २,००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये दिली जाते.

ही मदत थेट DBT (Direct Benefit Transfer) द्वारे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते, ज्यामुळे भ्रष्टाचार किंवा मध्यस्थांना थारा उरत नाही.

तुमच्या खात्यात पैसे येणार की नाही? ‘असे’ तपासा स्टेटस

हप्ता जमा होण्यापूर्वी तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे की नाही, हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे. खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा.

अधिकृत वेबसाईट: सर्वप्रथम pmkisan.gov.in वर जा.

Know Your Status: होमपेजवर ‘तुमची स्थिती जाणून घ्या’ या पर्यायावर क्लिक करा.

नोंदणी तपशील: तुमचा नोंदणी क्रमांक (Registration Number) टाका आणि मोबाईलवर आलेला OTP भरा.

निकाल: स्क्रीनवर तुम्हाला तुमच्या हप्त्याची सद्यस्थिती दिसेल.

स्मार्ट टिप: जर तुमचं e-KYC पूर्ण नसेल किंवा आधार बँक खात्याशी लिंक नसेल, तर तुमचा हप्ता अडकू शकतो. त्यामुळे ही कामे आजच पूर्ण करून घ्या!

लाभार्थी यादीत नाव कसे पाहायचे?

तुमच्या गावातील लाभार्थी यादी पाहण्यासाठी पोर्टलवर ‘Beneficiary List’ वर क्लिक करा. तिथे तुमचं राज्य, जिल्हा, तालुका आणि गाव निवडा. यादीत नाव असल्यास तुम्हाला २२ व्या हप्त्याचा लाभ नक्की मिळेल.

लाभार्थी यादी पाण्यासाठी येथे क्लिक करा 

 

Leave a Comment