NPS Pension Scheme GR:राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी द्यावयाच्या विकल्पाच्या कालावधीस मुदतवाढ देण्याबाबत.
राष्ट्रीय निवृत्तिवेतन प्रणाली लागू असलेल्या कर्मचाऱ्यांना राज्य शासनाची सुधारीत राष्ट्रीय निवृत्तिवेतन योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी दि.३१.०३.२०२५ पर्यंत विकल्प देण्याच्या सूचना संदर्भाधीन शासन निर्णयान्वये देण्यात आल्या आहेत. सदर कालावधीच्या पुढे विकल्प सादर करण्यासाठी १ वर्ष म्हणजेच दि.३१.०३.२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
२. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०२५०३२८१०३४५६८९०५ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
महत्वाची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा