New Model Tata Sierra Car 2025:टाटा सिएरा (Tata Sierra) ही 2025 मध्ये भारतीय बाजारात लॉन्च होणारी मोस्ट अवेटेड एसयूवी ठरली आहे. ऑटो सेक्टरमध्ये गेल्या काही महिन्यांपासूनच या कारची प्रतीक्षा होती. या कारच्या लॉन्चिंगने ह्युंदाई क्रेटा (Hyundai Creta) आणि किआ सेल्टोस (Kia Seltos) चे टेन्शन वाढवले आहे. कारण टाटा सिएरा या दोन्ही लोकप्रिय कारला थेट टक्कर देत आहे.
सिएरा, क्रेटा की सेल्टोस? कोणती कार दमदार? -टाटा सिएरा रेट्रो डिझाइन आणि आधुनिक फीचर्ससह बाजारात आली आहे. या कारची एक्स-शोरूम किंमत 11.49 लाख रुपयांपासून सुरू होते. तिच्या इतर व्हेरिएंट्सच्या किमतीसंदर्भात अद्याप माहिती समोर आलेली नाही. तिच्या तुलनेत, ह्युंदाई क्रेटाची एक्स-शोरूम किंमत 10.73 लाख रुपयांपासून ते 20.20 लाख रुपयांपर्यंत जाते.
याशिवया, किआ सेल्टोसची किंमत 10.79 लाख रुपयांपासून ते 19.81 लाख रुपयांपर्यंत जाते. या तीनही कारच्या आकारासंदर्भात बोलायचे झाल्यास, टाटा सिएरा ही ह्युंदाई क्रेटाच्या तुलनेत लांब आहे, मात्र किआ सेल्टोस सर्वात लांब कार आहे. मात्र, टाटा सिएराचा विचार करता ही कार, या सेगमेंटमधील सर्वात रुंद (चौडी) आणि सर्वात उंच कार आहे.
सिएरामध्ये सर्वाधिक व्हीलबेस मिळतो, यामुळे केबिनमध्ये भरपूर जागा मिळते. या एसयूव्ही सेगमेंटमध्ये साधारणपणे 400-500 लीटरचा बूट स्पेस मिळतो, मात्र टाटा सिएराचा बूट स्पेस 622 लीटरचा आहे. यामुळे ही कार या सेगमेंटमध्ये आघाडीवर जाते.
महत्वाचे म्हणजे, टाटा सिएरा, ह्युंदाई क्रेटा आणि किआ सेल्टोसमध्ये, टाटाची एसयूव्ही अधिक स्पेस देते. मात्र, ह्युंदाई क्रेटा आणि किआ सेल्टोसने एवढ्या दिवसांत ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. मत्र, टाटावरही लोकांचा मोठा विश्वास आहे.