New Maharashtra Cabinet List 2024:मंत्रीमंडळात कोणत्या चेहऱ्यांना संधी मिळणार? वाचा संपूर्ण यादी*
विधानसभेत महायुतीला यश मिळाल्यानंतर नव्या सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात आज महत्वाची बैठक होणार आहे.
तसेच आज एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती समोर आली आहे. यानंतर नवे मुख्यमंत्री कोण होणार, याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे.
याशिवाय नव्या कॅबिनेट मंत्रिमंडळात भाजपचे सर्वाधिक मंत्री असणार असून अजित पवार आणि एकनाथ शिंदेंना समसमान मंत्रिपदं देण्यात येणार आहेत.
लोखंड आणि सिमेंटच्या दरात अचानक इतक्या रुपयांची घसरण नवीन दर पहा
*मात्र मंत्रीमंडळात महायुतीच्या कोणत्या नव्या चेहऱ्यांना संधी मिळणार हे आपण जाणून घेऊयात…*
*भाजप :* देवेंद्र फडणवीस, राहुल कुल, मंगलप्रभात लोढा, संभाजी पाटील निलंगेकर, गणेश नाईक, नितेश राणे, संजय कुटे, शिवेंद्रराजे भोसले, माधुरी मिसाळ, राणाजगजितसिंह पाटील, गोपीचंद पडळकर, प्रसाद लाड
*शिवसेना शिंदे गट :* एकनाथ शिंदे, शंभुराज देसाई, उदय सामंत, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संजय राठोड, भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, राजेंद्र यड्रावकर, विजय शिवतारे
*राष्ट्रवादी अजित पवार गट :* अजित पवार, छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, अदिती तटकरे, संजय बनसोडे, संग्राम जगताप, इंद्रनील नाईक, मकरंद पाटील, सुनील शेळके, माणिकराव कोकाटे यांच्या नावाची चर्चा आहे. मात्र यावर अद्याप शिक्कामोर्तब झालेलं नाही.
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीही स्वस्त,जाणून घ्या सोन्या-चांदीचे नवीनतम दर.